नारायणी सिल्क साडी स्पर्धेचा निकाल जाहीर
Max Woman | 15 Sept 2019 1:42 PM IST
X
X
वटपोर्णिमेचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी नारायणी सिल्क तसेच मॅक्स वुमन तर्फे साडीची स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होती. यामध्ये साडी तुमच्या आवडीची, आठवणीतील पहिली साडी, मॅक्सवुमन स्पेशल साडी अशा तीन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेतील विजयी महीलांचा बक्षिस वितरण समारंभ, शनिवारी सायंकाळी ‘द सिल्क स्टुडीओ सीजन मॉल’ मध्ये पार पडला. या स्पर्धेमध्ये महीलांबरोबर पुरूषांनी ही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. तसंच बक्षिस वितरणाच्या झालेल्या या कार्यक्रमांमध्ये विजेत्यांबरोबरच उपस्थित प्रेक्षकांनी देखील आपली मतं नोंदवली. यामध्ये साडी ही केवळ एक वस्त्र नाही तर, त्याच्या अवतीभोवती अनेक आठवणी गुंफल्या गेल्याचं त्यांनी सांगीतलं.
साडी हा महिलांचा आवडता पेहराव असला तरी यावेळी उपस्थित पुरूषांनी देखील या पेहराव्याबद्दल अधिक माहीती दिली. मॅक्सवूमन तसंच नारायणी सिल्क साडी चे देखील उपस्थितांनी आभार मानले. तसंच नवयुवतींनी आशा माहितीत भर पडणाऱ्या अनोख्या स्पर्धा अधिक घेतल्या जाव्यात असं देखील सांगितलं.
यादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना नारायणी सिल्क चे विवेक सुर्यवंशी यांनी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. तसंच पुढील काळामध्ये नारायणी आपल्या ग्राहकांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना आणि स्पर्धा घेऊन येणार असल्याचं सांगितलं. तसेच मॅक्सवूमन मार्फत ही स्पर्धा सर्वदूर पोहोचल्याबद्दल मॅक्सवुमचे देखील त्यांनी आभार मानले.
मॅक्सवुमन आणि नारायणी सिल्क साडीव्दारे आयोजीत स्पर्धांपैकी, आठवण पहिल्या साडीची या स्पर्धेच्या पुजा मखे आणि अमिता लोणकर या विजेत्या आहेत.
दुसरी स्पर्धा म्हणजे साडी आणि बरंच काही या स्पर्धेचे अशोक गावडे हे विजयी ठरले आहेत. योगीनी कुलकर्णी, विजया ठवळे तसंच श्वेता गुजर या महिला मॅक्सवूमन नारायणी स्पेशल स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत.
ज्या महिला या स्पर्धेंच्या विजयी ठरल्या आहेत. परंतू बक्षिस वितरण समारंभाला अनुपस्थित होत्या. अशा महिलांनी मॅक्सवूमन किंवा नारायणी सिल्क साडी यांच्याशी संपर्क साधावा.
Updated : 15 Sept 2019 1:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire