ट्रेनमध्ये अभ्यास करणारी मुलगी
Max Woman | 20 Nov 2019 2:04 PM IST
X
X
'मुलगी शिकली, प्रगती झाली' हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो. एक शिकलेली मुलगी मोठेपणी सर्व कुटूंब सुशिक्षित करते. किंबहुना आपण रोज नवनवीन गोष्टी शिकत असतो,अभ्यास करण्यासाठी जागा महत्त्वाची नसते अभ्यास सर्वत्र आहे. तो फक्त शाळेतच पाहायला मिळत नाही. तो इतरत्र देखील पाहायला मिळतो. मुंबई या मोठ्या शहरात अनेक घटना घडत असतात.
अभ्यास करण्यासाठी काही घरातील पाल्य मुलाला अनेक आश्वासन देत असतात अभ्यास झाल्यावर तुला टीव्ही पाहता येईल,जेवता येईल,खेळायला जाता येईल पहिलं अभ्यास आणि नंतर मज्जा असा दिनक्रम सर्वच कुटूंबामध्ये पाहायला मिळतो. असंच काहीसं मुंबईच्या लोकलमध्ये पाहायला मिळालं. रात्रीचे साधारण १० -१०.३० ची वेळ पश्चिम रेल्वेमधील महिलांच्या डब्यामधील हे चित्र आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे महिलांचे डब्बे रिकामीच पाहायला मिळतात.
साधारणतः जे गरीब काम करणाऱ्या,मजुरी करणाऱ्या महिला या खाली बसतात आणि त्यांच्या गप्पा सुरु होतात, मात्र अश्यामध्येच एक विलक्षण गोष्ट दिसली ती म्हणजे एक ४थी किंवा ५ वी मध्ये शिकत असलेल्या वयाची मुलगी आपल्या पिशवीतून एक पुस्तक काढून वाचत बसली पुस्तकाच्या बाहेरच्या बाजूला भारताचे संविधान होते. पुस्तक वाचताना त्या मुलीच्या चेहऱ्यावर दिसणारा निरागसपणा आणि जसं घरी बसून वाचत असलेल्याचा भास. पुस्तकाला कव्हर नसल्यामुळे कोणतं पुस्तक आहे हे कळले नाही. हेच विलक्षण दृश्य आश्विनी माने यांनी आपल्या कॅमेरात कैद करून त्यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट वर "अभ्यास करायचा असेल तर होतो कुठेही" #MumbaiLocalDiaries असं लिहून पोस्ट केलं.
या फोटोकडे बघून अनेक गोष्टी लक्षात येतात सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर यामधून अनेक मुलींना प्रेरणा घेता येईल आणि ज्या मुली पाल्यांचे ऐकून अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा फोटो बघून स्वतःहून अभ्यास करण्याची. सामाजिक प्रगती आणि मुलींचे शिक्षण यावर अनेक योजना सरकारने केल्या. मात्र कित्येक मुलींपर्यंत या योजना जाऊन पोचहल्या हे प्रश्नचिन्हं आहे. ही वस्तुस्थिती मुंबईमधील आहे. गावाखेड्यात काय स्तिथी असेल हे आपण या फोटोवरून पाहू शकतो. शहरी साक्षर महिलांच्या तुलनेत अन्य घटकांतील साक्षर महिलांचे प्रमाण कमी आहे.
ग्रामीण भागात आणि अल्पसंख्याक समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत म्हणावी तितकी जागरूकता नाही. गरिबी आणि शिक्षण याचं देखील नातं आपल्या समाजात पाहायला मिळत. सरकारने दिलेले आकडे खरे असले तरी वस्तुस्थिती नेहमी खरी बोलते. त्यामुळेच मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्याबाबतचा व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आता आहे,निधान हे चित्र दुसऱ्या बाजूने पाहता येईल.
तेजस बोरघरे
Updated : 20 Nov 2019 2:04 PM IST
Tags: mumbai mumbai local
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire