Home > Uncategorized > आघाडीच्या जहिरनाम्यात महिलांसाठी ‘या’ खास ५ योजना

आघाडीच्या जहिरनाम्यात महिलांसाठी ‘या’ खास ५ योजना

आघाडीच्या जहिरनाम्यात महिलांसाठी ‘या’ खास ५ योजना
X

विधानसभेच्या धामधुमीत प्रत्येक पक्ष प्रचारासाठी आपले हमीपत्र जारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांचा जाहीरनामा जारी केला आहे. त्यामध्ये महिलांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा याला खास प्राधान्य दिले आहे.

१. महिलांना विशेष पाठबळ

- जिल्हा परिषद, नगर परिषद महानगर पालिका शाळांतील सर्व विद्यार्थीनीना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, सायकल्स, आणि निशुल्क वाहन सेवा देणार आहेत.

- सर्व मोठ्या शहरांत शिक्षण घेणाऱ्या युवतींसाठी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अल्प निवासाची वसतीगृहे उभारणार.

- परित्यक्ता स्त्रियांसाठी त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत तात्पुरती निवासव्यवस्था उपलब्ध करणार.

२. महिलांची सुरक्षितता

- मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मोफत व अनिवार्य करणार.

- कौटुंबिक हिंसाचार, तसेच सार्वजनिक व खाजगी ठिकाणी होणारी छेडछाड व हिंसा रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार.

- अवैध दारू विक्री च्या विरोधात कठोर कारवाईसाठी पावले उचलणार.

३. महिलांना सहाय्य

- महिलांना वैद्यकीय मानसिक आर्थिक सुरक्षितता या संदर्भात सहाय्य करणारे मध्यवर्ती मदत केंद्र उभारून पहिल्या टप्प्यात किमान विभागवार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हानिहाय केंद्र विकसित करणार.

- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पूर्ण महिला पोलीस ठाणे सुरू करणार एसटी स्थानके, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे येथे महिला पोलिसांची गस्त अधिक वाढविणार.

- मनोधैर्य योजनेअंतर्गत कॉस्मेटिक सर्जरी चाही खर्च पीडितेला देण्याची तरतूद करणार.

- लोकलमध्ये महिला डबे वाढविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार.

- सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था उपलब्ध करून देणार.

४. आर्थिक

- स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करणार.

- स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प आयोगाची स्थापना करणार यामार्फत स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीचे लेखापरीक्षण करणार आणि त्याचे विश्लेषण विधिमंडळात सादर केले जाणार.

- प्रत्येक मंत्रालयात जेंडर से कार्यान्वित करणार.

- महीला गृहा उद्योग यांच्यामार्फत विक्री होणारी उत्पादने जीएसटी तून वगळण्यासाठी पाठपुरावा करणार

- महिला बचत गटांना सरकारच्यावतीने सुरुवातीला दोन हजार कोटींचा व्यवसाय उपलब्ध करून देणार व टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करणार.

- ग्रामीण भागात पुरुष आणि स्त्रियांना असंघटित क्षेत्रातही समान वेतन मिळण्याच्या दृष्टीने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठाम भूमिका घेणार.

- घरेलू कामगार मंडळाचा निधी उपलब्ध करून देणार घरेलू कामगारांसाठी इएसआय योजना लागू करणार.

- दारिद्र रेषेखालील एकल महिला पालकांसाठी सिंगल मदर घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मानधन देणार.

५. महिला आणि आरोग्य

- स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या महिलांवर मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देणार कर्करोगाच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्या महिलांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार.

- 'आई व्ही एफ' साठी शासकीय योजना आखणार आणि त्या मार्फत मदत उपलब्ध करून देणार.

- प्रत्येक माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकिन, वेडिंग आणि डिस्पोजल यंत्र अनिवार्य करणार

Updated : 10 Oct 2019 9:21 PM IST
Next Story
Share it
Top