#King Maker : नयना कडू
X
प्रहार जनशक्तीचे नेते ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू, सर्व पक्षांच्या विरोधात लढून सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत. आज आपण जाणून घेणार आहे त्यांचा आधारस्तंभ म्हणजेच त्यांच्या पत्नी किंगमेकर नयना कडू यांच्याबद्दल.
चांदुरबार तालूक्यातील एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरात नयना कडू यांचा जन्म झाला. वडील शिक्षक असल्यानं घरात शिक्षणाची आवड आणि अगदी शिस्तप्रिय वातावरणात त्या लहानच्या मोठ्या झाल्या. लग्नाआधी १९९९ साली बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला असला तरी त्यांना २००३ मध्ये त्यांना त्यांच्या पत्नीची साथ मिळाली. २ ऑक्टोबर २००३ मध्ये नयमना कडू आणि बच्चू कडू यांचा विवाह झाला.
लग्नानंतर पती राजकारणात सक्रिय असताना त्यांच्या सोबत नयना कडू यांनी समाजकार्याला हातभार लावला. २००४ मध्ये लोकसभा निवडणूकीच्या वेळी एक कार्यकर्ता म्हणजेच बच्चू कडू संपूर्ण पक्षांच्या विरोधात अपक्ष लढत होते, त्यामुळे कोणत्याही पक्षाचे तसेच आर्थिक पाठबळ नसल्याने, निवडणूकीच्या प्रचारादरम्यान एक रूपया, एक मत असा उपक्रम राबवला गेला. यावेळी गरोदर असताना देखील पतीच्या विजयासाठी नयना यांनी प्रचार करत जागोजागी कोपरा सभा देखील घेतल्या.
चांदुरबार आणि आचलपूर या तालूक्यातील १००-१५० आजी-आजोबांबरोबर राहणाऱ्या अनाथ मुलांना शैक्षणीक मदत करून दरवर्षी दिवाळीतील धनत्रयोदशी दिवशी कडू दांपत्य दिवाळी साजरी करतात. तसेच त्यांनी पहिल्या टप्प्यात ४० च्या आसपास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटूंब दत्तक घेतली आहेत. या कुटूंबात लहान मुलं असतील तर त्यांचा संपूर्ण शैक्षणीक खर्चासाठी मदत करतात शिवाय विधवा महिलांना देखील मदत करतात. या कामामध्ये नयना कडू स्वत: जातीनं लक्ष देतात.
यावर्षी काहीकारणांमुळे इतर निवडणूकींप्रमाने जास्त सभांमध्ये भाग घेण त्यांना शक्य नव्हते. तरी देखील या सर्व गोष्टीतून वेळ काढून त्यांनी प्रहार जनशक्तीच्या उमेदवारांची प्रचारसभा घेतली आणि बच्चू कडू यांच्यासाठी देखील दोन तीन सभा घेतल्या आणि प्रहार जनशक्तीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं.
महाराष्ट्र विधानसभा २०१९ आचलपूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार बच्चू कडू सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यासंदर्भात मॅक्सवुमनशी बोलताना नयना कडू आनंद व्यक्त करत म्हणाल्या की, “मला विजयाची खात्री होती. पण यावेळी सर्वच पक्ष विरोधात होते आणि या सर्व पक्षाच्या विरोधात एका कार्यकर्त्याला लोकांमधून निवडून यायचं होतं. जो माणूस तळमळीतून लोकांसाठी काम करतो. त्याला लोक निवडून देणारचं असा मला आत्मविश्वास देखील होता असं त्या म्हणाल्या.