Honeymoon Destinations : हनिमूनला जाण्यासाठी भारतातील सर्वोत्तम 5 रोमँटिक ठिकाणे...
X
1 केरळ
केरळला पूर्वेचे व्हेनिस म्हटले जाते. या सुंदर हनिमून डेस्टिनेशनवर वर्षभर भारतीय आणि परदेशी पर्यटकांची गर्दी असते. येथे पाण्यावर तरंगणाऱ्या हाऊसबोटचा आनंद लुटण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. या व्यतिरिक्त तुम्हाला इथे चहाच्या बागा सापडतील, पर्वत आणि अनेक सुंदर दृश्ये पाहण्यास याठिकाणी आहेत.

2 अंदमान निकोबार
अंदमान आणि निकोबार- तुम्ही जर हॉलीवूड स्टाइल डेस्टिनेशनला भेट देण्याची नीयोजण आखत असाल तर अंदमान आणि निकोबार सर्वात उत्तम ठिकाण आहे. याठिकाणी समुद्रकिनाऱ्यांवर विखुरलेली वाळू, पामच्या झाडांना बांधलेले झुले, स्कूबा डायव्हिंग, ग्लास बोट राइड आणि विंड सर्फिंगचा रोमान्स हे सर्व तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येईल.

3 जम्मू आणि काश्मीर
जर तुम्ही दिल्ली-एनसीआर जवळ हनिमूनसाठी चांगले ठिकाण शोधत असाल, तर जम्मू आणि काश्मीर हा एक चांगला पर्याय आहे. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग हे प्रेम उगलांसाठी व नवीन जोडप्यांना खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. बर्फाच्छादित उंच पर्वत, मुघल गार्डन्स आणि हिरव्यागार दऱ्या इथे आहेत याठिकाणी हेच आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. हिवाळ्याच्या मोसमात, तुम्हाला येथे हिमवर्षावत रोमान्स करण्याची संधी देखील मिळेल.

4 उत्तराखंड
दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्यांसाठी उत्तराखंड हे नेहमीच उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. आपण एक सुंदर ठिकाण शोधत असाल आणि तुम्हाला जर अधिक रोमँटिक ठिकाणी जायचे असेल तर उत्तराखंड सर्वोत्तम आहे. येथे, नैनितालपासून औलीपर्यंत बर्फाच्या चादरीने झाकलेली ठिकाणं सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्समध्ये गणले जातात.

5 गोवा
जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने हनिमून साजरा करण्याचा विचार करत असाल तर गोवा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पाम वृक्षांनी वेढलेले बीच, प्राचीन चर्च आणि पाण्यातील अनेक वॉटर स्पोर्ट्स ही गोव्याची वैशिष्ट्ये आहेत. गोव्यात हनिमून साजरा करण्यासाठी अनेक समुद्रकिनारे आहेत, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता.
