गडचिरोली | दारुबंदीसाठी महीलांनी ३ तास रोखून धरला महामार्ग
Max Woman | 20 Nov 2019 1:34 PM IST
X
X
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अकिंसा गावामधील महिला दारुबंदीसाठी आक्रमक झाल्या आहेत. गावातील दारूची विक्री बंद करावी आणि दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील २०० महिलांनी महामार्ग ३ तास रोखून धरला. या आंदोलनात त्यांच्यासोबत गावातील युवा वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने सिरोंचा तालुक्यात अकिंसा गाव दारू विक्रीचे केंद्र म्हणून ओळखलं जातंय. काही दिवसांपूर्वी ‘मुक्तिपथ’ चमूने गावातील महिलांसह येथील २६ दारू विक्रेत्यांकडे धाड मारली होती. या विक्रेत्यांची नावंही पोलिसांकडे देण्यात आली होती. होती पण अद्यापही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे दारू विक्री अजुनही सुरुच आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या आंदोलनानंतरही कारवाई न झाल्यास थेट जिल्हा पोलिस मुख्यालयात आंदोलन करू असा ईशारा या महिलांनी दिला आहे.
Updated : 20 Nov 2019 1:34 PM IST
Tags: Gadchiroli
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire