एकूण उमेदवारांच्या तुलनेत राज्यात जेमतेम १० टक्के महिला रिंगणात
X
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीत स्त्रियांना 50% आरक्षण मिळावे याप्रकारचे सगळे दावे फोल ठरले आहेत. एकूण उमेदवारांच्या तुलनेत राज्यात जेमतेम १० टक्के महिला रिंगणात आहेत.
विधिमंडळ, संसदेत महिलांना आरक्षण देण्याची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने राज्यात १६४ उमेदवार विधानसभेच्या आखाडय़ात उतरविले असून त्यापैकी केवळ १०.३६ टक्के म्हणजेच १७ महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा महिला असताना १४७ उमेदवारांपैकी १०.२० टक्के म्हणजेच १५ महिलांना उमेदवारी दिली आहे. देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण देणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ पैकी नऊ महिलांना संधी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने १०, मनसेने पाच तर बहुजन समाज पार्टी सर्वाधिक २६२ जागा लढवत असून त्यांनीही केवळ ६ टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे.
जाणून घेऊया पक्षनुसार टक्केवारी :-
भाजप – १०.३६ टक्के
काँग्रेस – १०.२० टक्के
राष्ट्रवादी – ७ टक्के
शिवसेना – ६ टक्के
मनसे – ५ टक्के
वंचित आघाडी – ४ टक्के
आकडेवारी पाहता
स्त्रीशक्तीला कुठेतरी कमी गणलं जातंय असं दिसून येत.