Home > Tech > Google मोबाईल Storage चा प्रश्न मिटवणार..

Google मोबाईल Storage चा प्रश्न मिटवणार..

Google मोबाईल Storage चा प्रश्न मिटवणार..
X

टेक कंपनी Google ने Android डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी 'ऑटो-आर्काइव्ह फीचर' आणण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स डिव्हाइसचे स्टोरेज भरलेले असतानाही अॅप्स इन्स्टॉल करू शकतील.

ऑटो-आर्काइव्ह फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्ते सहसा वापरत नसलेल्या अॅप्सचा स्पेस जवळजवळ 60% कमी करते. कंपनीने दावा केला आहे की हे फीचर डिव्हाइसचा डेटा डिलीट न करता अॅपचा आकार कमी करते. ज्या अॅप्सचा आकार auto archive ने कमी केला जाईल..

ऑटो-आर्काइव्ह फीचरचे वैशिष्ट्य काय आहे?

ऑटो-आर्काइव्हद्वारे, Android डिव्हाइस वापरकर्ते अॅप पूर्णपणे डिलीट न करता त्यांच्या डिव्हाइसमध्ये जागा मोकळी करण्यात सक्षम होतील. म्हणजे काय तर वापरकर्त्याने ऑटो-आर्काइव्ह हे वैशिष्ट्य सुरू केल्यावर कमी वापर असलेले अॅप्स काढून टाकले जातील. मात्र, अॅपचा आयकॉन आणि यूजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल.

जेव्हा वापरकर्त्यांना हे अॅप्स वापरायचे असतील तेव्हा त्यांना ते पुन्हा डाउनलोड करण्यासाठी अॅपच्या आयकॉनवर टॅप करावे लागेल. यानंतर, त्याना या अॅपवरील त्यांचा संपूर्ण डेटा मिळेल..

Updated : 13 April 2023 7:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top