पॅरालिम्पिक्स साठी पारुल परमार सज्ज..
आपल्या अपंगत्वाशी लढत पॅरालिम्पिक्स स्पर्धेत सहभागी झालेल्या पारुल परमार कोण आहेत वाचा...
X
अर्जुन पुरस्कार विजेत्या पारुल परमार या आता टोकियो येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक्स (Tokyo Paralympics) सापर्धेसाठी सज्ज झाल्या आहेत. या वर्षीचे पॅरालिम्पिक्स उद्या पासून 5 सप्टेंबर पर्यंत टोक्यो शहरात होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताचे 54 खेळाडू 9 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
टोकियो या ठिकाणी आत्ताच ऑलम्पिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताने उत्तम कामगिरी केली. या वर्षी भारताला भालाफेक या खेळ प्रकारात नीरज चोप्रा याला सुवर्ण पदक देखील मिळवले. आता या स्पर्धेनंतर उद्या पासून पॅरालिम्पिक्स स्पर्धेला सुरवात होत आहे. आता या स्पर्धेत सहभागी झालेल्या पारुल परमार यांच्या कामगिरीबद्दल अनेक जण आशा व्यक्त करत आहेत.
कोण आहेत पारुल परमार?
पारुल परमार यांचा जन्म गुजरात मधील गांधीनगर येथे झाला. त्यांना लहानपणीच पोलिओ झाला होता. त्यानंतर Parul Parmar लहान असतानाच त्यांच्या मानेला देखील दुखापत झाली होती. त्यांचे वडील हे बॅडमिंटन खेळाडू होते. ते ज्या ठिकाणी खेळायला जायचे त्या ठिकाणी परूला देखील जाऊ लागल्या त्यानंतर त्यांची बॅडमिंटनची या खेळातील रुची वाढली. सुरेंद्र पारिख या प्रशिक्षकांकडे त्या कोचिंग घेऊ लागल्या व इथून त्यांचा बॅडमिंटन खेळातील प्रवास सुरु झाला. अपंग असल्याने त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यावर मात करत त्यांनी या खेळातील सर्व कौशल्य आत्मसात केली. यानंतर त्यांनी अनेक सापर्धेत दैदिप्यमान कामगिरी केली. 2007 साली पारूल यांना सिंगल्स आणि डबल्स या दोन्ही प्रकारांमध्ये जागतिक मानांकन मिळाले. 2015 आणि 2017 साली झालेल्या जागतिक चषकांमध्येही त्यांनी पुरस्कार मिळाले. 2014 आणि 2018 साली झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्येही त्यांनी सुवर्ण पदक मिळाले. या खेळ प्रकारात जागतिक क्रमवारीत त्या पहिल्या स्थानावर आहेत. 2009 साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा त्या टोकियो येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत सहभागी होत आहेत.
पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?
Paralympics ही एक अपंग असणाऱ्या खेळाडूंसाठीची ऑलम्पिक सारखीच स्पर्धा आहे. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.