Home > Sports > भारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानू ने पटकावलं सिल्व्हर

भारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानू ने पटकावलं सिल्व्हर

भारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानू ने पटकावलं सिल्व्हर
X

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) मीराबाई चानूने (Mirabai Chanu wins Silver) भारताचे पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजन गटातील महिलांच्या 'वेटलिफ्टिंग'मध्ये दमदार कामगिरी केली. मीराबाई चानूने स्नैच आणि क्लीन एंड जर्क या दोन राउंडमध्ये एकूण 202 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले आहे.

मीराबाई चानू हिने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपविली. चानूने स्नैच राउंडमध्ये 87 किलो तर एंड जर्कमध्ये 115 किलो वजन असे एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमधील ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरीने 2000 साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताने प्रथमच पदक जिंकले आहे.

मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले आहे. मीराबाई चानू यांच्या उत्तम कामगिरीने भारत उत्साहित असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानू यांचे अभिनंदन आणि त्याचे यश प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देणारे असल्याचं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.

Updated : 24 July 2021 2:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top