Home > Sports > Nikhat Zareen : जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण..

Nikhat Zareen : जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण..

Nikhat Zareen : जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण..
X

भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे. मेरी कोमने तिच्या आधी हा पराक्रम केला आहे. या चॅम्पियनशिपमधील भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. निखतच्या आधी स्वीटी आणि नीतूने सुवर्णपदक पटकावले आहे.

50 किलो वजनी गटात गतविजेता म्हणून प्रवेश केलेल्या 26 वर्षीय निखतने व्हिएतनामच्या दोन वेळच्या आशियाई चॅम्पियन गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. लव्हलिना बोरगोहेनची ७५ किलो वजनी गटातील सामना देखील लवकरच सुरू होणार आहे.

नीतू आणि स्वीटीने एक दिवसापूर्वी सुवर्णपदक जिंकले होते

एक दिवस आधी नीतू घनघास आणि स्वीटी बुरा यांनीही सुवर्ण जिंकले होते. स्वीटीने ८१ किलो वजनी गटात चीनच्या वांग लीचा ४-३ असा पराभव केला. सामना संपल्यानंतर तिला रिव्ह्यूच्या निकालाची वाट पाहावी लागली, पण शेवटी स्विटीनेच विजेतेपद पटकावत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

त्याआधी हरियाणाची बॉक्सर नीतू हिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. नीतूने शनिवारी अंतिम फेरीत २०२२ आशियाई चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या मंगोलियाच्या लुत्सेखान अल्तानसेगचा पराभव केला. नीतूने लुत्से खान अल्तानसेगचा 5-0 असा पराभव करून एकतर्फी विजय मिळवला.

जगज्जेता बनणारी नीतू सहावी भारतीय ठरली..

या विजयासह हरियाणातील 22 वर्षीय नीतू विश्वविजेता बनणारी सहावी भारतीय बॉक्सर (पुरुष आणि महिला) ठरली. यापूर्वी सहा वेळा चॅम्पियन मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018), सरिता देवी (2006), जेनी (2006), लेखा केसी (2006) आणि निखत जरीन (2022) यांनी हा पराक्रम केला आहे. नीतूच्या पदकानंतर, भारताकडे आता जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये एकूण 11 सुवर्णपदके आहेत, त्यापैकी एमसी मेरी कोमची सर्वाधिक सहा आहे.

Updated : 26 March 2023 7:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top