भारतीय हॉकीच्या महिला संघाकडून अमेरिका भुईसपाट.
Max Woman | 2 Nov 2019 8:53 PM IST
X
X
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. पुरुषांमागोमाग आता स्त्रियांमध्ये देखील हॉकी खेळण्यात रस वाढू लागला आहे. महिलाही मोठ्या उत्साहात हॉकी खेळत आहेत.
ऑलम्पिक मध्ये पात्र होण्यासाठी भारतासमोर अमेरिकेचे मोठं आव्हान होतं. टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगीरी करत अमेरिकेचा ५-१ अशा गोलफरकाने धुव्वा उडवला आहे. ओडिशातील कलिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपले वर्चस्व गाजवले.
भारताच्या विजयात गुरजीत कौरने निर्णायक भूमिका निभावली. गुरजीतने दोन अप्रतिम गोल डागले तर लिलिमा मिंज, शर्मिला आणि सलिमा तेते या तिघींनी प्रत्येकी एकेक गोल डागून भारताचा विजय सोपा केला. या विजयामुळे भारतीय संघ ऑलिम्पिक पात्रतेच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.
भारताचा हा महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल का याची आज अवघ्या देशाला लागलेली आहे.
Updated : 2 Nov 2019 8:53 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire