Jemimah Rodrigues : क्रिकेट नाही तर हॉकीत रस होता, धडाकेबाज खेळाडू जेमिमा रोड्रिग्स कोण आहे?
X
भारतीय महिला क्रिकेट संघातील युवा स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्स यांची ओळख आपल्या एक युवा क्रिकेटर म्हणून आज झाली आहे. असं असलं तरी पहिला त्यांना क्रिकेट खेळात करियर करायचं नव्हतं. अअअअ तुम्ही म्हणाल काय सांगताय राव.. आहो जेमिमा विषयी अजून खूप इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ते ही पुढच्या एका मिनिटात. भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू अवघ्या 21 वर्षांची आहे. आहो जेमिमा आपल्या महाराष्ट्राची आपल्या मुंबईची कन्या आहे. 5 सप्टेंबर, 2000 रोजी जन्म झालेली जेमिमा कमी वयातच भारतीय संघात निवडली गेली. आजवरच्या करियर मध्ये तिने स्थानिक क्रिकेटमध्येही बरच नाव कमावलं आहे. विशेष म्हणजे जेमिमा आधी क्रिकेटर बनणारच नव्हती. तर तिला हॉकी खेळात रस होता.. तिने हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलं होते. पण नंतर काय घडलं... तर तिने पुढे हॉकी नाही तर तिने क्रिकेटर होण्याचं ठरवलं आणि तिचे वडिल इवान रोड्रिग्सचं तिचे पहिले प्रशिक्षक बनले. जेमिमाने स्थानिक क्रिकेटमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरवात केली. तिने मुंबई संघाकडून खेळताना सौराष्ट्र विरुद्ध दुहेरी शतक ठोकलं होतं. या सामान्य नंतर तिने अनेकांच्या काळजात तिने आपल्या खेळाने घर केले.. 163 चेंडूत तिने 202 धावा केल्या होत्या तिने. तिच्या आधी अशी कामगिरी करणारी स्मृति मांधना ही एकमेव भारतीय आहे.