Home > सावित्री उत्सव > #सावित्रीउत्सव : सावित्री मागचे जोती

#सावित्रीउत्सव : सावित्री मागचे जोती

3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या उपक्रमा अंतर्गत अनेक महिला त्यांच्याकार्यक्षेत्रातील त्यांचे अनूभव व सावित्रीजोतींचे योगीदान सांगत आहेत. अशाच एक पालघर जिल्ह्यातील शिक्षीका प्रिता पाटील.

#सावित्रीउत्सव : सावित्री मागचे जोती
X

3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या उपक्रमा अंतर्गत अनेक महिला त्यांच्याकार्यक्षेत्रातील त्यांचे अनूभव व सावित्रीजोतींचे योगीदान सांगत आहेत. अशाच एक पालघर जिल्ह्यातील शिक्षीका प्रिता पाटील.

प्रिता या पेशाने शिक्षक असून कवयित्री, लेखिका सुध्दा आहेत. त्यांनी "पोएट्री मॅरेथॉन" या जागतिक काव्यसंमेलनातही आपल्या कविता सादर केल्या आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. प्रिता म्हणतात या प्रवासामधील माझे पती माझे जोती..

प्रिता म्हणतात की, "स्त्रीमुक्तीला जन्म देणारे महामानव महत्मा जोतिबा फुले यांनी सावित्रीशी लग्नापुरतीच गाठ न बांधता तिच्या विचारांची, मनाशी, उणीवांशी गाठ बांधली. सच्चा साथीदार होऊन तिला सक्षम बनवलं, त्यानंतर समाजाशी नाळ जोडून ते या मंगलबंधनातून राष्ट्रबंधनाकडे वळले, हे माझ्या मनाला खूप भावले."

"माझ्या आयुष्यात सुरुवातीपासून मला साथ सोबत करणारे माझे पती शशिकांत सखाराम पाटील. माझे जोतिबा."

"त्यांच्यामुळेच मी लग्नानंतर राष्ट्र सेवा दल या समतेचा विचार मांडणाऱ्या संघटनेमध्ये सहभागी झाले. माझ्या नवऱ्याच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कलापथकात नृत्य, गाणं, पथनाट्य, लेझिम यांची मला जवळून ओळख झाली. सांस्कृतिक अंगाने माझ्यात बदल होत गेले."

"माझ्या शिक्षिकी पेशाला पोषक वातावरण मिळून क्रियाशीलतेला वाव मिळाला. व्यक्तिमत्व विकास शिबिरे, श्रमसंस्कार शिबिरे, स्पर्धा, सहली या राष्ट्रसेवादलाच्या विविध कार्यक्रमात सहभागी झाले. माझा आत्मविश्वास दुणावला अन् माझ्यातील 'मी' चा मला शोध घेता आला. स्वतःचे निर्णय मला घेता आले."

"मी कोकण मराठी साहित्य संमेलन, अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरणवादी विविध संस्था,काव्यसंमेलने ,महिला पतपेढी, या मध्ये अनेक पदे भूषविली. माझा "अंतर्नाद" हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्यानंतर 'चिवचिवाट ' व 'गोवा सौंदर्य' या प्रतिनिधिक काव्यसंग्रहात सहभाग नोंदविला. तसेच "पोएट्री मॅरेथॉन" या जागतिक काव्यसंमेलनात सहभागी झाले. साहित्यिक क्षेत्रात माझी धडपड सुरू झाली."

"मला 'गुणवंत शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेत पुरस्कार मिळाले. यंदाचा तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. हे सारे मला साध्य करता आले ते माझ्या आयुष्यात सावली सारखा सोबत असणाऱ्या माझ्या जोतिबामुळे, माझ्या नवऱ्यामुळेच."

"३ जानेवारीला आमच्या घरामध्ये हा दिवस सणासारखा आम्ही साजरा करणार आहोत. पण त्याच बरोबर माझ्या विद्यार्थ्यांना, सहकारी शिक्षकांना असेच प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या साठी सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून देणार आहे. काव्यस्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समूहगीत, समुहनृत्य स्पर्धा आयोजित करणार आहे."

तू पिंजरा उघडला आहेस,

तिच्या मनाचा गाभाऱ्याचा !

अन् आत्मविश्वासाने भरलेले पाऊल,

तुझ्याकडे पाहून तिने पुढे सरसावलं!!


Updated : 25 Dec 2020 4:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top