"शीतल आमटेंच्या जाण्याने मी खुप अस्वस्थ" मयुरी ने सांगितली मन की बात
"शीतल आमटेंच्या जाण्याने मी खुप अस्वस्थ" मयुरी ने सांगितली मन की बात
X
काही दिवसापूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुख हीचा पती मयुरेश देशमुख यांने नैराश्येतून आत्महत्येचे पाऊल उचलले होते. त्या वेळी शितल आमटे यांनी त्यांना धीर देऊन तिच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या आहेत असे सांगितले होते. आणि आता त्यांनीच आत्महत्या केल्याने मी खूप अस्वस्थ झाले आहे. असे मयुरी देशमुख सोशल मिडियात शेअर केलेल्या एका व्हिडिओत व्यक्त झाली आहे.
काय म्हणाली आहे मयुरी या व्हिडिओत?
"शितल आमटेंच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ झाली आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यांनी काही आठवड्यांपूर्वी फेसबुकवर मला मॅसेज केला होता. त्यांनी मला धीर दिला. त्यांनी माझा नंबर घेतला व त्यांचा नंबर मला दिला. माझ्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या आहेत असे देखील त्यांनी सांगितल्याचे मयुरीने म्हटले आहे.
पुढे ती म्हणते शीतल आमटे यांच्या जाण्याने मला खूप त्रास होतोय. मला माहित नाही माझी मते बरोबर आहेत की चुकीची, पण आज मी त्याबद्दल बोलेन, एक समाज म्हणून आपण ताकत आणि सहनशीलता या व्याख्यांना फार चुकीच्या पद्धतीने मांडले आहे.. मुलांनी रडलं नाही पाहिजे. सगळी संकटं एकट्याने पेलली पाहिजेत. समाजातील मोठ्या व्यक्तिंवरही आपण हा भार टाकतो. पण ते बदलणे खूप गरजेचे आहे. अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठी फार घातक ठरतेय. आशुतोष गेल्यानंतर अनेकांनी मला मेसेज केले की तू खूप धीराने घेतलेस. पण मी तर रोज रडतेय. रोज मला त्रास होतोय. मग मी स्ट्राँग कशी? पण मी माझ्या जवळच्या व्यक्तींना माझ्या मनातलं सर्वकाही सांगतेय.प्रत्येकाच्या तरी आयुष्यात असा एखादा व्यक्ती असावा की ज्याला आपण कोणताही विचार न करता सर्वकाही सांगू शकतो. गोष्टी शेअर न केल्यास मनात साठून राहत असतात. आणि मग वाट मिळत नाही. कुणाचीही मदत मागण्यात काहीच चुकीचं नाही त्यात स्वाभिमान कुठेच मध्ये येत नाही. पण खरा संवाद करण्याची गरज आहे.
या दोन्ही घटनांवर मयुरीने मनमोकळेपणे आपले मत मांडले आहे.