तब्बल दिड लाख राख्या पाठविणारी ताई
माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून साजरे होते दरवर्षी अनोखे रक्षाबंधन
X
रक्षाबंधन दिवशी आपल्या अमरावती जिल्ह्यासह ठिकठिकाणी तब्बल दिड लाख राख्या पाठवून काँग्रेसच्या नेत्या, आमदार तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून दरवर्षी अनोखे रक्षाबंधन साजरे होते. ॲड. यशोमती ठाकूर यांनी हा अनोखा उपक्रम सुरू करीत नात्यांमधील गोडवा जपण्याचे काम केले आहे. त्यामुळे रक्षाबंधन दारम्यांन ॲड. यशोमती ठाकूर यांची ओळख तब्बल दिड लाख राख्या पाठविणारी ताई अशी बनली आहे.
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि विश्वासाचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात आनंदासाठी प्रार्थना करतात. मात्र ज्यांना बहीण नाही अशा अनेक मंडळींना ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून तब्बल दिड लाख राख्या खरेदी करून त्या ३३८ गावाममध्ये पाठविल्या जातात. विशेष म्हणजे या उपक्रमात राख्यांची ही संख्या दरवर्षी वाढत जात असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
यावर्षी ही ॲड. यशोमती ठाकूर यांनी ही परंपरा कायम ठेवत तब्बल दिड लाख राख्या खरेदी केल्या आहेत. तसेच रक्षाबंधन दिवशी वेळेत मिळाव्यात यासाठी त्या आपल्या हातांनी लिफाफ्यामध्ये बंद केल्या आहेत. यासोबतच ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रत्येक भाऊ- बहिणीला रक्षाबंधन सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तब्बल दिड लाख राख्या पाठविणारी ताई आणि अनोखे रक्षाबंधनाचे कौतुक सर्व स्तरांतून होत आहे.