Home > Political > त्या मनावरील दगडाचा अर्थ 'पाठिंबा' असा घ्यायचा का ? यशोमती ठाकूर यांच्या टोला

त्या मनावरील दगडाचा अर्थ 'पाठिंबा' असा घ्यायचा का ? यशोमती ठाकूर यांच्या टोला

त्या मनावरील दगडाचा अर्थ पाठिंबा असा घ्यायचा का ? यशोमती ठाकूर यांच्या टोला
X

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केले, या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या व माजी मंत्री (महिला व बाल विकास) ॲड. यशोमती ठाकूर यांनी सूचक ट्विट करीत भाजपाला टोला लगावला आहे.


"मनावर ठेवलेला 'दगड' भाजपा कधीही काढू शकेल. या दगडाचा अर्थ 'पाठिंबा' असा घ्यायचा का ? त्यामुळे एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री झाल्याचा आनंद बंडखोर शिवसैनिकांना झाला असला तरी, मोदी सैनिकांना याचे अतीव दु:ख आहेच. काळ सोकावतोय!" अशा आशयाचे हे ट्विट ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. एवढंच नाही तर ॲड. ठाकूर यांनी या ट्विटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करीत थेट भाजपवर निशाणा साधला आहे. यात त्या म्हणाल्या आहेत की मनावर ठेवलेल्या त्या दगडाचा अर्थ पाठिंबा असा घ्यायचा का असा खोचक प्रतिप्रश्न देखील त्यांनी या ट्विटमधून विचारला आहे.




सोबतच त्यांनी सदर ट्विटमध्ये एकनाथ शिंदे जी राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद बंडखोर शिवसैनिकांना झाला असला तरी, मोदी सैनिकांना याचे अतीव दु:ख झाल्याची खंत व्यक्त केली आहे. म्हातारी मेल्याच दु:ख नाही, पण काळ सोकावतोय असा गर्भितार्थ त्यांनी या ट्विटमध्ये मांडला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या माध्यमातून चांगलीच चर्चेत आली आहे.

Updated : 24 July 2022 10:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top