Home > Political > बळवंत वानखेडे यशोमती ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट : नवनीत राणांना पुन्हा केलं लक्ष्य

बळवंत वानखेडे यशोमती ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट : नवनीत राणांना पुन्हा केलं लक्ष्य

बळवंत वानखेडे यशोमती ठाकूर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट : नवनीत राणांना पुन्हा केलं लक्ष्य
X

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे लोकसभा निवडणुकीत निश्चितच विजयी होतील आणि ते विजयी झाल्यानंतर मातोश्री निवासस्थानी भेट देतील, असा विश्वास प्रचारादरम्यान व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीने अमरावतीत मिळवलेल्या या विजयानंतर आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी भेट घेतली. दरम्यान त्यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेतली.

भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव

अमरावती लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. नवनीत राणा या हनुमान चालीसा प्रकरण आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे काहीही झाले तरी नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेतून निवडून जाऊ द्यायचे नाही, असा निर्धार अमरावतीतील ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता.

लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सभा अमरावतीत बळवंत वानखेडे यांच्या समर्थनार्थ घेण्यात आल्या होत्या. त्या सभांचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. अमरावतीत महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार वानखडे यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न फळाला आले आणि ते विजयी झाले. त्यामुळे बळवंत वानखेडे यांनी विजयी झाल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे कुटुंबीयांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.




यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणा यांच्यावर निशाणा

बळवंत वानखेडे यांच्या विजयानंतर गाडीच्या टापावर बसून यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांची नकल करत बाण मारला होता, व विजय साजरा केला होता, या विजयात ठाकरेंचा मोठा वाटा असल्यामुळे, बळवंत वानखेडे यशोमती ठाकूर ठाकरेंच्या भेटीला आले होते, यावेळी

आमदार यशोमती ठाकूर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना नवनीत राणांना पुनः लक्ष्य केलं, गेल्या निवडणुकीत आम्ही मदत केल्यामुळे निवडून आले होते, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत कोण पावरफुल आहे हे दाखवून दिल.

Updated : 12 Jun 2024 12:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top