राज्यातील प्रचारात सर्वपक्षीय महिला नेत्या आक्रमक
X
हैदराबाद येथे एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या विरोधात रणशिंग फुकणाऱ्या नवनीत राणा आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा सदस्या व प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गद्दारीवरुन जिव्हारी लागणारी टीका केली. तर शिवसेनेच्या सुषमा अंधारे विरोधकाचा यथेच्छ समाचार घेतात. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व प्रणिती शिंदे व तसेच शिंदे गटाच्या शितल म्हात्रे,ज्योती वाघमारे या महिला नेत्यांनी प्रचाराची धुरा प्रभावीपणे सांभाळली आहे.
भाजपाच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांनी हैद्राबादमध्ये ओविसी यांना अव्हान दिले. त्यामुळे सध्या १५ मिनिटे विरुद्ध १५ सेकंद असा हा वाद रंगला आहे. तर चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या खाजदार चिरंजिवांना डिवचले. त्यामुळे शिंदे गट संतप्त झाला होता. सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघातील मतदान झाले असल्याने त्या इतर टप्प्यातील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी अहमदनगरचे उमेद्वार नीलेश लंके यांना दम देणाऱ्या अजित पवार यांना इशाारा दिला आहे. भाजपच्या बीड येथील उमेदवार पंकजा मुंडे यांची भाषणे गाजली.
पण बीडमध्ये लढत असल्याने मुंडे या मतदारसंघात अडकुन पडल्या सोलापूरच्या काँग्रेस उमेद्वार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील प्रचारादरम्यान मोदी सरकारला जाब विचारला. भाजप संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देत असल्याचा प्रचार त्यांनी ठणकावून केला आहे . तर काँग्रेसच्या दुसऱ्या स्टार प्रचारक यशोमती ठाकूर यांच्यावर काही मतदारसंघांची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या सभांना भरघोज प्रतिसाद मिळत आहे.
आशात विरोधी नेत्याची टर उडविण्याच्या त्यांच्या ग्रामीण बाज असलेल्या भाषणांना चांगलाच प्रतिसाद मिळतो. अंधारे यांना प्रचारासाठी ठाकरे गटाच्या उमेद्वारांकडून अधिक पसंती दिली जाते. भाजपच्या वतीने चित्रा वाघ या ठिकठिकाणी दौरे करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण तर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाची बाजू लावून धरली आहे. विद्या चव्हाण यांनी टिकेला प्रत्युत्तर दिले. तर चाकणकर या अजित पवार गटाचा किल्ला लढवित आहेत.
तर शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही पक्षांच्या उमेद्वारांच्या प्राचारार्थ सभा घेतल्या. शिवसेना शिंदे गटाच्या शितल म्हात्रे व ज्योती वाघमारे या पक्षाची बाजू मांडण्याची कामगिरी करतात विशेषत ; ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत यामुळे एकूणच राज्यात महिला नेत्यांची प्रचारात आक्रमक भूमिका राहिली असल्याची दिसून येते.
.