Home > Political > रूपाली ठोंबरे पुन्हा मनसेत या..

रूपाली ठोंबरे पुन्हा मनसेत या..

गुरूपौर्णिमा होऊन इतके दिवस झाले तरी समाजमाध्यमांवर रुपाली ठोंबरे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केलेली पोस्ट आजही चर्चेचा विषय ठरत आहे. रुपाली ठोंबरे यांनी नक्की काय पोस्ट केली होती आणि सध्या त्या पोस्टची काय चर्चा चालू आहे पाहा..

रूपाली ठोंबरे पुन्हा मनसेत या..
X

काही दिवसांपूर्वी सर्वत्र गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्ताने अनेकजण समाजमाध्यमांवर आपल्या गुरुंना शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. अशाच प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटिल यांनी देखील त्यांच्या राजकिय क्षेत्रातील गुरुचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देत त्यांनी म्हंटले आहे कि, "माझे राजकीय गुरुवर्य यांना नतमस्तक प्रणाम" "गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाहीध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!





राज ठाकरे यांचा फोटो देखील रुपाली ठोंबरे यांनी शेअर केल्यानंतर सध्या समाजमाध्यमांवर मोठी चर्चा आहे. त्यांच्या याच फोटोला जास्त लाईक आणि कमेंट देखील आल्या आहेत. खरतर रुपाली ठोंबरे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला एक मनसैनिक म्हणून झाली. रुपाली ठोंबरे या पूर्वी मनसेत होत्या. मागच्या काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनेक मनसैनिक नाराज झाले, मनसेच्या महिला आघाडीत सुद्धा नाराजी पाहायला मिळाली. कारण रुपाली ठोंबरे या अत्यंत ऍक्टिव्ह कार्यकर्त्या होत्या. आता समाजमाध्यमांवर काल त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मनसेत पुन्हा येण्याचा सल्ला दिला आहे. नक्की काय प्रतिकिया आल्या आहेत त्या देखील आपण पाहुयात.

Hemant Gurunath Bhakare या फेसबुक वापरकर्त्या ठोंबरेंना म्हणत आहेत की, "ताई विचार करा आणि पुन्हा मनसे मध्ये या, या पुढचा वेळ हा फक्त मनसे चा आहे"

Vaibhav Jadhav हे फेसबुक वापरकर्ते त्यानी शेअर केलेल्या फोटोवर कॉमेंट करत म्हणत आहेत कि, ''ताई मनसेत या माघारी परत''





Tushar Dankhade यांनी तर तुमचा गुरु राज ठाकरेच शोभतात असं म्हणत एक सल्ला सुद्धा दिला आहे. त्यांनी म्हंटल आहे कि, ''ताई तुमचा स्वभाव बेधडक आहे त्यामुळे तुमचा गुरू राजकीय वर्तुळात राज साहेबच शोभतात तुम्ही पक्ष कितीही बदला मात्र गुरू 1 चं रहुद्या ''




अशा प्रतिक्रीया ठोंबरे-पाटिल यांच्या पोस्ट ला आल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा मनसेत येण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारे सध्या रुपाली ठोंबरे व राज ठाकरेंच्या फोटोची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु आहे. रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्र्वादीतच राहावं कि मनसेत पुनः यावं यावर तुम्हाला काय वाटत हे देखील तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा..

Updated : 17 July 2022 7:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top