Home > Political > लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावतींची लखनऊमध्ये मोठी घोषणा

लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावतींची लखनऊमध्ये मोठी घोषणा

लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार; मायावतींची लखनऊमध्ये मोठी घोषणा
X

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी आज लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. लखनौ येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना मायावती यांनी सांगितले की, त्यांनी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये येण्याचे प्रस्ताव नाकारले आहेत. मायावती यांनी यावेळी समाजवादी पार्टीसह भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

मायावती म्हणाल्या की, युतीमुळे पक्षाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. त्यांनी आरोप केला की, समाजवादी पार्टीने बसपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.

मायावती यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करताना सांगितले की, बसप देशातील सर्वात मोठ्या दलांपैकी एक आहे आणि त्यांना लोकांमध्ये मोठा पाठिंबा आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, बसप लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल.





मायावती यांच्या या घोषणेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घोषणेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

बसपचे लोकसभेत सध्या १० खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील जाटव या अनुसूचित जातीच्या समाजावर बसपचा प्रभाव आहे. मायावतींच्या स्वबळावर लढण्याची घोषणेमुळे उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, समाजवादी पार्टी आणि बसप यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

Updated : 15 Jan 2024 4:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top