Home > Political > बारामतीची सून ऋण फेडणार ? काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

बारामतीची सून ऋण फेडणार ? काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

बारामतीची सून ऋण फेडणार ? काय म्हणाल्या सुनेत्रा पवार
X

आपला विजय निश्चितअसून तुमच्या वहिनीला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. एका मोठ्या पर्वाची सुरुवात मी आज करत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची ही सून आपल्या जनतेचे ऋण फेडणार आहे, असा निर्धार महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केला.

व्यापक हितासाठी मी थांबलो: विजय शिवतारे

स्थानिक पातळीवरील हेतू ठेवून मी काम केले तर महायुतीचे नुकसान होईल. सुरुवातीचा काळ अडचणीचा होता. वैयक्तिक वाद, मतभेद असतात पण मनभेद नाहीत. व्यापक हितासाठी मी थांबलो, अशा शब्दात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपली भूमिका बारामतीकरांसमोर मांडली. ते पुढे म्हणाले, ही निवडणूक भावनात्मक बाजूने नाही.

नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. स्थानिक पातळीवर मी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून जर काम केले तर संपूर्ण राज्यातील महायुतीला तडा जाईल. पन्नास वर्षापासून बारामती पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न कायम आहे. याबाबत मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बोललो. यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. वैयक्तिक सगळे वाद मतभेद सोडून मी आता अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे यावेळी विजय शिवतारे म्हणाले.

या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मतदान करा

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील मारुती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. पवार पुढे म्हणाल्या, काटेवाडी-कण्हेरी गावापासूनच माझ्या समाजकारणाची सुरुवात झाली आहे. तुम्ही मला जो विश्वास दिला त्या आधारावर तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. दादा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

माझ्या कामात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. येथून पुढे देखील ते माझ्या पाठीशी राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेली कामे जगासमोर आहेत. त्यामुळे सबंध जनतेत मोदी एके मोदी असाच नारा आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या आहेत. अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मतदान करा, असे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.

Updated : 20 April 2024 7:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top