यापैकी कुठल्या महिला आमदाराचं भाषण तुम्हाला दमदार वाटलं?
X
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी 10 मार्चला संपलं. या अधिवेशनात 'महिला' केंद्रबींदु होत्या. मग ते अगदी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात असो किंवा विरोधीपक्ष नेत्यांनी मांडलेल्या राज्यातील प्रश्नात 'महिला' हा घटकच केंद्रबिंदू होता.
या महिला केंद्री अधिवेशनात महिला आमदारांनी देखील आपआपल्या मतदार संघातील मुद्दे मांडले. यातील कुठल्या कुठल्या महिला आमदाराचं भाषण लोकांना प्रभावी वाटलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. त्यामुळे यापैकी कुठल्या महिला आमदाराचं भाषण तुम्हाला दमदार वाटलं? हे नक्की लिहा..
मत देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://poll.app.do/pg/poll-3146073
महिला आमदारांची भाषणे -
राज्यात कोरोनाचे संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागल्याने सरकार दक्ष झाले. या संदर्भात अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आपलं मत व्यक्त केलं.
त्या म्हणाल्या "अमरावतीत लॉकडाउन लागल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पालक मंत्र्यांनी स्थानीक लोकप्रतिनिधींना विश्वात न घेता हा निर्णय घेतला. त्यामुळे आता जवळपास 40 ते 50 टक्के लोकांवर उपासमारिची परिस्थिती निर्माण झालेय. त्यामुळे आता लॉकडाउन करन काही होणार नाही तर आरोग्य सेवा वाढवणं काळाची गरज बनलेय."
नेटसेट बाधीत निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन अजूनही सुरु झालेलं नाही. त्यामुळे अशा शिक्षकांच्या कुटुंबीयांनी कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याचं शिवसेना आमदार मनिशा कायंदे यांनी विधान परिषदेत मांडला.
2018/19 च्या काळात शेतकऱ्यांना 63 कोटींची मदत जाहिर झाली होती ती अजूनही त्यांना मिळालेली नाही, ती त्यांना देण्यात यावी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची विधान सभेत मागणी
अनुराधा नागरी सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराची सरकार चौकशी करणार का? बॅंकेवर फौजदारी गुन्हा किती दिवसांत दाखल करणार? आमदार श्वेता महाले यांनी सभागृहात उपस्थित केला प्रश्न
पोलीसांचं कुटुंब समाधानी नसेल तर कर्मचारी तणावाखाली असतात. त्यामुळे पोलीसांचे वेतन भत्ते सुरळीत करुन त्यांच्या गृहनिर्माणाचा प्रश्न मार्गी लावावा शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची विधानसभेत मागणी
"त्यावेळी ज्या शिवसैनीकांनी विमाकंपन्यांचे ऑफीस फोडले ते आता गप्प का?" शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरुन भाजप आमदार मेघना बोर्डीकर आक्रमक
विधान परिषदेत जेव्हा भावाच्या प्रश्नांना बहिण उत्तर देते विधान परिषदेत अनिकेत तटकरेंच्या प्रश्नांना मंत्री आदिती तटकरे यांचं उत्तर
मुलांच्या परिक्षांसोबतच त्यांच्या आरोग्याची सुरक्षा ही सुध्दा आम्ही प्राथमीक जबाबदारी आहे – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
'कोविड काळात आम्हीसुध्दा सरकारला सहकार्य केलंय' – भाजप आमदार मनिषा चौधरी
'कृपया आरोग्य सेवकांचे मानधन लवकरात लवकर द्या' – आमदार सरोज अहिरे
"या विभागाचं काम रोजगार निर्मितीचं नाही, पोषणाचं आहे" – मंत्री यशोमती ठाकूर