एकनाथ शिंदे आनंद दिघेंचीच शिकवणं विसरले...
X
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. हा चित्रपटात आनंद दिघे यांच्या जीवनात आधारित आल्यामुळे त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ शिंदे व दादा भुसे यांचा सुद्धा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे. याच चित्रपटातील एक सीनची सध्या जोरात चर्चा आणि तुम्हाला देखील या चित्रपटातील हा सिन आठवत असेल, तर एक नगरसेवक त्याने नवीन कार घेतली म्हणून आनंद दिघे यांना पेढे देण्यासाठी येतो. त्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर इतक्या कमी वेळात गाडी काशी काय घेतली म्हणून आनंद दिघे त्याला बाजूला घेऊन त्याची चांगलीच धुलाई करतात. व त्याला तुम्ही या पदावर पैसे कमवण्यासाठी नाही तर लोकहिताची कामे करण्यासाठी असल्याचं सांगतात. चित्रपटातील याच सिन मुळे आता एकनाथ शिंदे यांची चर्चा आहे. तर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे त्यांची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आहेच. पण समाजमाध्यमांवर चालू असलेली चर्चा थोडी वेगळीच आहे.
ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या प्रॉपर्टीची? तुम्ही म्हणाल हे काय आता. तर एकनाथ शिंदे यांची प्रॉपर्टी पाहून आज आनंद दिघे असते तर त्यांनी काय केलं असतं असा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केला जातोय. खरंच एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती आहे? हे पाहण्यासाठी आम्ही त्यांची संपत्ती तपासून पाहिली. तर यातून काय समोर आलं पहा.
एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती आहे?
आता एकनाथ शिंदे हे सुरुवातीला रिक्षा चालवत होते हे तुम्हाला सर्वांना माहित असेल पण त्यानंतर ते राजकारणात आले व त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदापासून आज थेट मंत्री पदापर्यंत प्रवास केला आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे एकनाथ शिंदे नक्की कोण आहेत? त्यांची संपत्ती किती आहे? राजकारणा व्यतिरिक्त त्यांचे आणखीन काय व्यवसाय आहेत? असे अनेक प्रश्न जाणून घेण्याची उत्सुकता आता लोकांना लागली आहे. तर शिंदे यांनी 2019 साली भरलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची संपत्ती किती आहे याची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे शिंदे यांच्याकडे गाड्या, बंगले, शेतजमीन, सोनेणाने, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये केलेली गुंतवूक अशी मिळून करोडो रुपयांची संपत्ती असल्याचं दिसत आहे.
शिंदे यंच्याकडे एकूण सात गाड्या आहेत..
एकनाथ शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण सात गाड्या आहेत. यामध्ये आरमाडा या गाडीची किंमत 96 हजार 720 रुपये, त्यांच्याकडे दोन स्कॉर्पिओ कार आहेत त्यांची किंमत 10 लाखांच्या आसपास आहे. तर 34 लाख रुपयांच्या दोन इनोव्हा कार सुद्धा त्यांच्याकडे आहेत. आशा एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 46 लाख 55 हजार रुपयांच्या गाड्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे 25 लाख रुपयांचे सोने आहे..
शिंदे यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे 4 लाख 12 हजार 500 रुपयांचे 110 ग्रॅमचे सोने आहे. तर 21 लाख 75 हजार रुपयांचे 580 ग्रॅमचे सोने आहे. असं दोन्ही मिळून त्यांच्याकडे एकूण 25 लाख 87 हजार 500 रुपयांचे सोने आहे.
शिंदे यांच्याकडे 4 लाखांहून अधिक रुपयांचे रिव्हॉल्व्हर व पिस्तुल आहे..
एकनाथ शिंदे यांच्याकडे एक 2 लाख 50 हजार रुपयांचे एक रिव्हॉल्व्हर तर 2 लाख 25 हजार रुपयांचे एक पिस्तूल सुद्धा आहे. याशिवाय त्यांच्याकडे 7 हजार रुपयांचे फर्निचर, 63 रुपयांचा कम्प्युटर याचं सोबत त्यांचे जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्यामध्ये साधारण 2 करोडहून अधिक रुपयांची संपत्ती आहे.
शिंदे यांच्याकडे असलेल्या बंगले, फ्लॅट दुकान गळ्यांची किंमत साधारण 9 कोटींहून अधिक आहे..
एकनाथ शिंदे यांचे ठाणे पश्चिम मध्ये लँडमार्क हौसिंग सोसायटी मध्ये 2 हजार 370 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे दोन फ्लॅट आहेत ज्याची किंमत 9 करोड रुपये इतकी आहे. या दोन प्लेट सोबत त्यांची ठाण्यातील धोत्रे चौक या ठिकाणी असलेल्या व शिवशक्ती भवन रोड वागळे इस्टेट या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 60 लाखांच्या आसपास आहे. यासोबत शिंदे यांचा वागळे इस्टेट ठाणे या ठिकाणी 600 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचा एक दुकान गाळ देखील आहे ज्याची किंमत तीन लाख रुपये इतकी आहे. अशी त्यांच्याकडे एकूण 9 कोटी 45 लाख 50 हजार रुपयांची संपत्ती आहे.
तर साधारण एकनाथ शिंदे यांच्याकडे इतकी संपत्ती आहे. यामध्ये त्यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचे कर्ज देखील आहे. एकनाथ शिंदे यांच्या याच या करोडो रुपयांच्या संपत्तीची सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे. एका नगरसेवकाने लोकहिताचे काम न करता गाडी घेतली म्हणून त्याला बेदम मारहाण करणारे आनंद दिघे जर आज असते तर एकनाथ शिंदे यांची ही इतकी अमाप संपत्ती पाहून त्यांनी काय केले असते? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.