Home > Political > "नवनीत राणा यांनी भाजपसाठी डान्स करावा, तिने नको त्या फंदात पडू नये'' विश्वनाथ महाडेश्वर यांचा इशारा..

"नवनीत राणा यांनी भाजपसाठी डान्स करावा, तिने नको त्या फंदात पडू नये'' विश्वनाथ महाडेश्वर यांचा इशारा..

नवनीत राणा यांनी एक हीरोइन म्हणून बीजेपीसाठी डान्स करावा. तिने नको त्या फंदात पडू नये. जर मातोश्री जवळ कोण आलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही. असा इशारा विश्वनाथ महाडेश्वर यांचा राणा दाम्पत्यांना दिला आहे.

नवनीत राणा यांनी भाजपसाठी डान्स करावा, तिने नको त्या फंदात पडू नये  विश्वनाथ महाडेश्वर यांचा इशारा..
X

आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानंतर राजकीय वातावरण जोरात तापले आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले असून ते राणा दाम्पत्याचा निषेध करत आहेत. यावेळी मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांनी, ''नवनीत राणा यांनी एक हीरोइन म्हणून बीजेपीसाठी डान्स करावा. तिने नको त्या फंदात पडू नये. जर मातोश्री जवळ कोण आलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही.'' असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे आता संपूर्ण राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज हनुमान जयंती निमित्त रवी राणा आणि नवनीत राणा त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंती निमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचली पाहिजे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार जागृत केले पाहिजे. मुख्यमंत्री हनुमान चालीसा वाचत नसतील तर त्यांना बाळासाहेबांचा विसर पडला आहे. त्यांना जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर मी आणि नवनीत राणा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचे वाचन आणि बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांना विसर पडला आहे त्याची त्यांना जाणीव करून देणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हंटल आहे. राणा यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर शिवसैनिक जमले असून मातोश्री जवळ कोण आलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही असे थेट आव्हान दिले आहे.

मुंबईचे माजी महापौर व नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांनी काय म्हंटल आहे पाहुयात..

आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना आम्ही काय करावं हे सांगण्याचा भारतीय संविधानाने अधिकार दिलेला नाही. रवी राणा म्हणजे सर्वोच्च नाही. त्यांनी मातोश्रीला आव्हान देण्याचं काम करू नये. नवनीत राणा यांनी एक हीरोइन म्हणून बीजेपीसाठी डान्स करावा. तिने नको त्या फंदात पडू नये. जर मातोश्री जवळ कोण आलं तर त्यांना आम्ही सोडणार नसल्याचं त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हंटल आहे.

Updated : 16 April 2022 12:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top