"तापसी आणि अनुरागच्या घरावर आयकर विभागाचे छापे राजकीय आकसातून"
तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे राजकीय आकसातून टाकल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
X
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करणारी अभिनेत्री तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्याघरांवर व्यक्तींवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या सोबतच विकास बहल, मधु मेंटे यांच्या घरावर देखील छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागामार्फत मुंबईत सुमारे २२ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
इन्कम टॅक्स विभागाचे हे सर्व छापे फॅन्टम फिल्म्सशी संबंधीतांवर टाकण्यात आले आहेत. अनुराग कश्यप हा फॅंटम कंपनीचा भाग होता आणि त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्यावर छापा टाकला आहे.
आयकर विभागाच्या या छाप्यांवर मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली असून त्यांनी "जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात वा सरकार विरोधात आवाज उठवतात त्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयकर विभाग छापे टाकते असे वारंवार दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे केंद्र सरकारच्या कामाबाबत टिप्पणी करत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी याप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. कुठेतरी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतेय." असं म्हटलं आहे.