#आत्मनिर्भरभारत: जुमला पॅकेज लवकर पुर्ण करण्याची वर्षा गायकवाड यांची विनंती
X
कोरोनाच्या संकटातून देशाला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख करोड रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. #आत्मनिर्भरभारत या अभियानासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी सलग तीन दिवस विविध क्षेत्रांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जुमला पॅकेज असं म्हणत सरकारने काल्पनिक मदतीऐवजी वास्तविक मदत करावी टीका केली आहे.
हे ही वाचा...
- गुजरातच्या प्रेमापोटी मोदींनी मुंबईची संधी हिसकावली- वर्षा गायकवाड
- 'कधी पर्यंत आमदार विकत घेऊन सरकार बनवणार?', विद्या चव्हाणांचा घणाघाती टोला
- सामनातुन भाजपच्या अंर्तगत वादात तेल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या पॅकेजची घोषणा या शेतकरी आणि श्रमिकांसाठी आर्थिक स्वरुपाची मदत नसून फक्त त्य़ांच्या माथ्यावर कर्ज मारण्यासाठी केलेल्या योजना आहेत अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. त्याच पार्श्वभुमीवर वर्षा गायकवाड यांनी स्थलांतरीत कामगार, MSME क्षेत्रातील श्रमिक आणि शेतकरी यांची जगण्याची प्रेरणा संपण्यापुर्वी आपल्या प्रेरणादायी पॅकेजची घोषणा संपवावी असं मत व्यक्त केलं आहे.
“अर्थमंत्री संपुर्ण प्रेरणादायी पॅकेजची घोषणा पूर्ण करण्यापूर्वी बरेच स्थलांतरित कामगार, MSME आणि शेतकरी जगण्याची प्रेरणा हरवून बसतील. आशा आहे की सरकारने काल्पनिक मदतीऐवजी वास्तविक मदत करावी.”
Before the Finance Minister finishes the announcement of entire stimulus package many migrant workers, msmes and farmers will loose their stimulus to live and survive. Hope government gives actual and not fictional help. #JumlaPackage #MigrantLivesMatter
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) May 16, 2020