Home > गुजरातच्या प्रेमापोटी मोदींनी मुंबईची संधी हिसकावली - वर्षा गायकवाड

गुजरातच्या प्रेमापोटी मोदींनी मुंबईची संधी हिसकावली - वर्षा गायकवाड

गुजरातच्या प्रेमापोटी मोदींनी मुंबईची संधी हिसकावली - वर्षा गायकवाड
X

केंद्र सरकारने महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच राज्याला मोठा झटका देणारा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्राचं मुख्यालय (IFSC) हे देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थात मुंबईत होणं अपेक्षित असताना, ते गुजरातला करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाचे पंतप्रधान आहेत की फक्त एका राज्याचे असा सवाल उपस्थित केलाय.

हे ही वाचा..

त्यांना आपल्या ट्वीटर हॅडलवर म्हटलंय की, 'रेस्ट इन पीस’ IFSC (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र) मुंबईचं स्वप्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात प्रति असलेल्या पक्षपाती प्रेमामुळे IFSC मुख्यालय मुंबईत होण्याची संधी हिरावली गेली. पी. एम. देशासाठी आहेत की फक्त एका राज्यासाठी?

देशाचा अव्वल मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बॅंक, सेबी यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था मुंबईतच आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरात मघ्ये स्थापन करुन नरेंद्र मोदी मुंबईसोबत दुजाभाव करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Updated : 2 May 2020 3:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top