Home > Political > MLC Election 2022: उमा खापरे यांची विकेट जाणार...?

MLC Election 2022: उमा खापरे यांची विकेट जाणार...?

MLC Election 2022:  उमा खापरे यांची विकेट जाणार...?
X

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान झाले. आता या निवडणुकीच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. काही वेळातच निकाल समोर येतील. या निकालात उमा खापरे यांचं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. आज दिवसभर या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे विधान परिषदेचा निकाल राज्यसभेच्या निकालाप्रमाणेच लांबणीवर पडेल की काय असे सर्वांना वाटत होतं. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळला व काही वेळात मतमोजणीला सुरवात झाली आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपच्या संख्याबळानुसार विधान परिषदेवर चार उमेदवार निवडून जाऊ शकत होते. मात्र भाजपने पाचवा अतिरिक्त उमेदवार दिला. त्यामुळे उमा खापरे यांना शेवटचा पसंतिक्रम देण्याचं पक्षाने ठरवलं असल्याचं म्हंटल जात आहे. त्याचाच फटका उमा खापरे यांना बसेल का? जर भाजपने केलेली रणनिती चुकीची ठरली तर उमा खापर याना पराभवाचा सामना करावा लागणार आहे असं म्हंटल जात आहे. आता या सगळ्यात देवेन्द्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी होते की भाजपच्या उमेदवाराचा प्रभाव होतो हे काही वेळात स्पष्ट होईल..

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. तसेच उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

विधान परिषदेच्या या निवडणुकीत भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे निवडणुकीच्या मैदानात होते. तर शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर आणि काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. दहा जगांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती.

Updated : 20 Jun 2022 8:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top