उद्धव ठाकरे नोकरदार आणि रश्मी ठाकरे व्यवसायिक, पाहा कोणाची संपत्ती जास्त
X
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) याच्या संपत्तीसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना खुपच उत्सुकता होती. आजपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची माहिती कधीही सार्वजनिक झाली नव्हती. विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावे अधिक संपत्ती असल्याची माहिती समोर आलीय.
हे ही वाचा..
- आता रंगणार अमृता विरुद्ध रश्मी सामना
- मला सैन्याची गरज नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे
- शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांचा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची संपत्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त आहे.
उद्धव ठाकरे यांनी उत्पन्नाचा स्त्रोत हा नोकरी दाखवला असून उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता २४ कोटी १३ लाख इतकी आहे. तर रश्मी ठाकरे यांचं उत्पन्नाचं साधन बिझनेस आहे. एकूण जंगम मालमत्ता ३६ कोटी १६ लाख आहे.
रश्मी ठाकरे यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत व्यवसाय, इंटरेस्ट, रेंट, शेअर ऑफ प्रोफिट, डिविडंड आणि कॅपिटल गेन असा दाखवण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या Join अकाउंट मध्ये अधिक पैसे आहेत. विशेष बाब म्हणजे मातोश्री बंगला अजुनही बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर आहे. रश्मी ठाकरे यांना सरकारी एजन्सीकडून 26 हजार रुपये येणं बाकी आहे.
उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 143 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये शेतजमीन, त्यांच्या बंगल्याची किंमत आणि दागिन्याचा समावेश आहे.
null
null