‘देवस्थानं कोणाच्याच बापाची खाजगी मिळकत नाही’, तृप्ती देसाईंचा चव्हाणांना पाठींबा
X
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली होती. त्यावर वेगवेगळ्या स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी चव्हाण यांच्यावर टीकाही केली होती.
हे ही वाचा...
- तर सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही- तृप्ती देसाई
- मग दारुड्यांना आता शासनदाता असं नाव ठेवावं- तृप्ती देसाई
- निर्मला सितारमणांची जबाबदारी, पृथ्वीराज चव्हाणांची भीती
यावर भूमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी पृथ्वीराज यांच्या सूचनेला पाठींबा दर्शवताना “देश संकटात आहे अशा वेळेला दारू विकून किंवा जनतेला दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा हा पर्याय कधीही योग्यच राहील.” असं मत व्यक्त केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अभ्यासपुर्ण असून काही लोकांनी त्यांच्यावर धर्म विरोधी सूचना केल्याचा आव आणत टीका केल्या आहे. अशा टीकाकारांना तृप्ती देसाई यांनी सडेतोड उत्तर देताना म्हटलंय की,
“पृथ्वीराज चव्हाण यांचे डोके ठिकाणावर आहे तुमचे डोके ठिकाणावर ठेवून टीका करा, देवस्थान ही कोणाच्याच बापाची खाजगी मिळकत नाही ओ. यात देवाला अर्पण केलेले पैसे, सोने जे काही असते ते भक्तांनी मनोभावे अर्पण केलेले असते आणि त्याचा उपयोग जर देश संकटात असेल तेव्हा झाला तर नक्कीच देवालाही आनंद होईल"
दरम्यान, संबंधित सूचना केंद्र सरकारच्या चालू योजनेचाच एक भाग असल्याचं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, असं त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
अशा प्रकारची योजना पहिल्यांदा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९८ च्या अणू चाचणीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर १९९९ साली Gold Deposit Scheme या नावाने सुरू केली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचे नाव बदलून Gold Monetization Scheme, २०१५ अशी नवी योजना सुरू केली, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.