Home > Political > यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम; तिवसा नगरपंचायत भाजपमुक्त

यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम; तिवसा नगरपंचायत भाजपमुक्त

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीचे अंतिम निकाल हाती आले असून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ता कायम ठेवत नगरपंचायत भाजपमुक्त केली आहे.

यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम; तिवसा नगरपंचायत भाजपमुक्त
X

तिवसा नगरपंचायतच्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांच्या पक्षाच्या तीन जागा वाढल्याने अन्य पक्षांना खाते देखील उघडता आले नाही.

विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्षांना एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसने तब्बल १२ जागांवर विजय मिळविला असून शिवसेनेचे चार तर वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार निवडून आला. वंचितने तिवसा नगरपंचायतीत पहिल्यांदाच आपले खाते उघडले आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नऊ उमेदवार निवडून आले होते, त्यात यावेळी तीनने वाढ झाल्याने काँग्रेसची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. सेनेचे गेल्या वेळीसुद्धा चार उमेदवार निवडून आले होते. त्यांनी आपल्या जागा कायम राखल्या आहेत. भाजपला या नगरपंचायतीत मागच्या निवडणुकीत सुद्धा भोपळा फोडता आला नाही व यावेळीसुद्धा त्यांची परीस्थिती कायम आहे.

तिवसा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान पार पडले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिवसा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी तब्बल १२ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तिवसा नगरपंचायतवर पुन्हा एकहाती काँग्रेसची सत्ता आली आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत, तर वंचितला एका जागेवर समाधान मानावे लागेल. तसेच राष्ट्रवादी, भाजपला याठिकाणी खातंही उघडता आलं नाही.

तिवसा नगरपंचायतीसाठी ७६.८६ टक्के मतदान -

सार्वत्रिक निवडणुकीत तिवसा नगरपंचायतसाठी 76.86 टक्के मतदान झाले होते. ओबीसी आरक्षणमुळे रखडलेल्या तीन जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. याकरिता 13 उमेदवार रिंगणात होते. तीन जागांसाठी एकूण 1757 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष 903 तर 855 महिलांनी मतदान केले.

अमरावती जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक

तिवसा नगर पंचायत

एकूण जागा :- १७

भाजप:- ००

काँग्रेस:- १२

वंचित:- ०१

अपक्ष:- ००

शिवसेना:- ०४

Updated : 19 Jan 2022 12:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top