स्वाती मलीवाल यांना आम आदमी पार्टीकडून राज्यसभेची उमेदवारी .
X
आम आदमी पार्टीच्या नेत्या व दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलीवाल यांना आम आदमी पार्टीची राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे.तसा निर्णय आम आदमी पार्टीकडून घेण्यात आला आहे. तशी घोषणा ही पार्टीकडून करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत संजय सिंह यांच्याही उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी स्वाती मलीवाल या आपली उमेदवारी दाखल करणार आहेत . स्वाती मलीवाल यांना सुशील कुमार गुप्ता यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. सुशील कुमार गुप्ता यांनी पक्षाकडे हरियाणा मधून आगामी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली असून त्यांनी राज्यसभेवर जाण्यास अनुकलता दर्शवल्या नंतर पक्षाने स्वाती मलीवाल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. स्वाती मलीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे .
कोण आहेत स्वाती मलीवाल?
स्वाती मलीवाल यांची खरी ओळख ही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आहे. त्यांचा जन्म हा उत्तप्रदेशातील गाझियाबादचा.माहिती आणि तंत्रज्ञानात विषयात पदवीधर असलेल्या स्वाती यांनी गडगंज पगाराची नोकरी सोडून परिवर्तन या NGO मध्ये सामील झाल्या. पुढे त्या India Against Corruption या अण्णा हजारे यांच्या चळवळीच्या मध्ये सामील झाल्या . यात काम करत असताना त्यांचा अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क आला. पुढे आम आदमी पार्टीची दिल्ली मध्ये सत्ता आल्यानंतर त्या २०१५ ते जानेवारी २०२४ पर्यंत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिल्या. २०१८ साली रेप करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी साठी १० दिवस उपोषण केलं. त्या वेळेस त्या देशात चर्चेत आल्या होत्या.