राज्यपालांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेचे हटके ट्विट
X
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी निघाले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.राज्यपालांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवरून टीका होत आहे.
दरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. अन पालकाने राज्यप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ववाने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे.
परंतु महामहीम कोशारीजी यांचेकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण ...असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे.
त्याचबरोबर राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे.चला महाराष्ट्र धर्म वाचवण्याची जपण्याची आणि वाढवण्याची ही मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया.. असे त्या म्हणत आहेत .