''देवेंद्र फडणवीस हे कुचकामी..'' सुषमा अंधारे यांचा टोला
X
संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्थ आहे. या निमित्ताने गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत, का असा प्रश्न उपस्थित होतो. सातत्याने राजकीय नेत्यांवर होणारे हल्ले हे कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अपयशी ठरत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वर्कलोड जास्त झाला असल्याचे दिसत आहे. अकोल्याचे पालकमंत्री असतानाही फडणवीस यांना सहा महिन्यातून एकदाही येण्याची फुरसत मिळाली नाही. त्यामुळे ते खूप काम करत असल्याचे दिसत आहे. त्यांनी वर्कलोड जरा कमी करावा आणि तूमच्या पक्षातील अनेक नेते काम करण्यास इच्छुक आहेत. तुमच्याच भागातील बच्चू कडू यांना जर गृहमंत्री पद दिले तर ते चांगलं काम करू शकतील, असा टोलाही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
हक्कभंग समितीचा घोळ मला काही सुचत नाही आहे. हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी आक्रमक झालेले आशिष शेलार किंवा भाजपा हेच सर्व लोक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बरडत होते, तेव्हा का बरं बोलले नाही. तेव्हा हक्कभंग सोडा साधा ठरावही त्यांनी मांडला नाही. शेलार का बर आक्रमक होत आहेत. शेलार यांनी काही चोरी केली आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रज्ञा सातव यांनी संतोष बांगर यांच्यावर आरोप केलेले आहेतच. संतोष बांगर यांचा आतापर्यंतचे वर्तन पाहिलं तर ते वादग्रस्तच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चकार शब्द बोलत नाहीत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तोंडावर बोट ठेवून चूप बसतात. फडणवीस साहेबांचं व्हायलनट होवून सायलेंट होणं हे फारच सिलेक्टिव्ह चालत राहते. हा एका सत्तेचा गैरवापर आहे, यावर त्यांना जाब विचारायला पाहिजे, असेही ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शेवटी म्हणाल्यात.