सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, अमृता फडणवीस यांचा आरोप
X
अभिनेता सुशांत सिंह यांच्या आत्महत्येच्या तपासावरुन सध्या मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरू केल्यानंतर मुंबई महापालिकेने बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला सक्तीने क्वारंटाईन केले आहे. यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. बिहारचे पोलीस आपले काम करत आहेत, यात कोणतेही राजकारण नाही असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “ मुंबई पोलीस ज्या पद्धतीने सुशांत सिंहचे आत्महत्या प्रकरण हाताळत आहेत ते पाहता मुंबईत माणुसकी शिल्लक नाही. तसंच निष्पाप आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी मुंबई आता सुरक्षित नाही असे वाटते,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled - I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live - for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020