"विनम्रपणे सांगायचंय,दमदाटी घरी करा" अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा टोला
X
निलेश लंके यांच्या उमेद्ववारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये बरीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यानंतर अजित पवार यांनी निलेश लंके यांच्या विरोधात जाहीर सभांमधून थेट टिका करायला सुरुवात केली. तर लोकसभा निवडणुकांच्या प्रचारांच्या निमित्ताने निलेश लंके यांच्या प्रचारार्थ एकीकडे महाविकास आघाडीचे नेते प्रचार करत असताना, दुसरीकडे अजितपवारांनी स्वत: निलेश लंके यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. मात्र आता शरद पवार गटाच्या खाजदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांना थेट प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
तसेच अजित पवार यांनी निलेश लंके यांच्या विरोधात प्रचारसभा घेताना त्यांना जाहीर इशारा दिला आहे. ते अस म्हणतात की " “अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. जर तु जर धमक्या दिल्यास माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिलास आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझी अशी जिरवीन, की पुन्हा तुला सतत अजित पवार समोर दिसेल. तू माझ्या नादी लागू नको महाराष्ट्रात जे- जे माझ्या नादी लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है? तू काय समजतोस स्वत:ला?” तर असा धमकीवजा इशाराच अजित पवारांनी दिला. जाहीर सभांमधुन अजित पवारांकडून निलेश लंकेंना अशाप्रकारे थेट इशारे दिले जात असताना सुप्रिया सुळेंनी निलेश लंकेंची बाजू घेत अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे. जाहिृर प्रचार सभेत सुप्रिया सुळेंनी केलेल्या या टीकेचा रोख थेट अजित पवारांच्याच दिशेने असल्याच बोललं जात आहे. सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणात नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे.
ते म्हणतात 'मी सकाळी लवकर उठतो'. "अहो सकाळी सगळेच लवकर उठतात. अणि दमदाटीच राहू द्या. कोण घाबरत नाही त्याला तसेच दमदाटी केली तर ती सुसंकृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही ती खपवुन देखील घेणार नाही. निलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचे आहे. दमदाटी तुमच्या घरात चालवा, बाहेर नका चालवू", असा सल्ला अजित पवारांना बहीण सुप्रिया यांनी दिला आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना देखील टोला लगावला. यावेळी सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नाव न घेता त्यांना टोला दिला. अजित पवारांच्या टिकेवर बोलतांना त्या म्हणाल्या “यांना कशाला घाबरता? हे ज्यांना घाबरतात, त्यांच्यासमोर डंके की चोटपर मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषणं करतो. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत