"मग आम्ही मुली परवडल्या",अजित पवारांना सुप्रिया सुळेंचा टोला
X
राष्ट्रवादीच्या ४० पेक्षा जास्त आमदारांसोबत अजित पवारांनी बंड केले आहे.महाराष्ट्राचे नवे उप मुख्यमंत्री सुद्धा अजित पवार झाले आहेत. या परिस्थितीत शरद पवारांच्या अगदी जवळचे सारे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. यामध्ये ८ जणांना मंत्रिपद सुद्धा मिळाले आहे.पण इतक्या वर्षातील पक्षातील असणारी नाराजी अजित पवारांनी सुद्धा बोलून दाखवली आहे.
या साऱ्या सत्तानाट्यात अजित पवार ,सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या नात्यात आलेला दुरावा स्पष्ट जाणवत आहे. अजित पवार आमदारांसोबत एका बाजूला आणि पवार फॅमिली एका बाजूला झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे शरद पवारांना पक्षबांधणीसाठी पुन्हा एक नवी सुरुवात करावी लागत असल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हंटल आहे "वय जास्त झालं ८२ ,झालं ८३ झालं तुम्ही कधी थांबणार आहात कि नाही ... एखादा माणूस ५८ व्य वर्षी रिटायर होतो ७५ वर्षानंतर राजकारणात रिटायर होतो,नवीन पिढी पुढं येते त्यांना आशीर्वाद द्या ,पण का अश्याप्रकाराचं वातावरण तयार केलं जातं ?"
याला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.