सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर थेट निशाणा
X
पत्राचाळ प्रकरणी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेतले. याप्रकरणी त्यांना तीन दिवसांची म्हणजेच ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशातील जीएसटी विषय गंभीर बनत आहे. यामध्ये मोदी सरकार बॅड प्लानिंग असलेले सरकार आहे. वास्तवतेपासून दूर गेलेल्या सरकारने भारताच्या इकॉनोमीमध्ये प्रचंड गोंधळ करून ठेवला आहे अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली.
काय म्हणाल्या संजय राऊत प्रकरणावर
संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाई झाल्या नंतर अनेकांनी राऊत यांच्या समर्थनार्थ माध्यमांना प्रतिक्रीया दिल्या आहेत, त्या म्हणाल्या की.. इडीच्या कारवाया सातत्याने विरोधकांवरच होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिल देशमुख, नवाब मलिक, आणि आता संजय राऊत विरोधी पक्षावर ह्या कारवाई सातत्याने होत आहेत. शेवटी लढेंगे सत्यमेव जयते मला न्यायालयावर विश्वास आहे. आज ना उद्या न्याय नक्की मिळेल. यावेळी संजय राऊतांवर पवार का बोलले नाही? असा प्रश्न विचारल्या नंतर सुप्रिया सुळे यांनी.. "देशात काही झालं तरी पवारांच्या आजुबाजूला या गोष्टी फिरतात मला याचा आनंद आहे" त्या पुढे म्हणाल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तीघांवर पण कारवाया झाल्या, "या ईडी कारवाया भाजपवर का झाल्या नाहीत ?" असा आरोप त्यांनी केंद्र सराकावर केला.
अन्नधान्यावर जीएसटी लावू नका
सुप्रिया सुळेना पत्रकारांनी जीएसटी संदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या."जीएसटी हा खूप गंभीर विषय आहे. आणि सातत्याने यावर बोलत आहोत. दूधावर जीएसटी लावणार नाही अस आदरणीय पंतप्रधान म्हटले आहेत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये हा एकमताने निर्णय झाला आहे. अजित पवारांनी स्वतः पत्र लिहिलं होतं अन्नधान्यावर जीएसटी लावू नका. त्यामुळे जीएसटी लावण्या संदर्भात महाराष्ट्राची कोणतीही भूमिका यामध्ये नव्हती त्यामुळे हे खुप दुर्दैवी बाब आहे". त्या पुढे म्हणाल्या,"गरिब कष्टकरी ज्यांनी विश्वासाच्या नात्यांनी या सरकारला मतदान केल. त्यामुळे त्याच्या हिताचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा सर्वसामान्यांच्या माध्यमातून सरकार सर्व सामान्यांवर अन्याय करत आहे",असं मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.