सुप्रिया सुळेंची मोदी सरकरावर तीव्र टीका
X
लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका केल्या आहेत."आमच्याकडून चुका झाल्या असतील पण काम करणाऱ्यांकडूनच चुका होतात.त्याचबरोबर केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंनी परखड मत व्यक्त केले आहे. एटीएम व्यवहार केल्यावर आपलेच पैसे काढायला आम्हाला पैसे द्यावे लागतात.नवीन डेबिट कार्ड,बँक स्टेटमेंट ,चेक बुक यासाठी चार्ज का घेतले जातात? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर मी अर्थतज्ञ नाही पण UPA च्या काळात जे सिलिंडर ३०० ते ४०० रुपयाला होता तो आता १००० रुपये इतका झाला आहे. हा जादूचा आकडा बाजारात आहे . महागाई आणि केंद्र सरकारचे निर्णय यांवर सुप्रिया सुळे यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचबरोबर पोट आकड्यांनी भरत नाही ते धान्यांमध्ये भरत असा वास्तववादी टोला केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी दिला आहे .
तसेच सुप्रिया सुळे यांनी "एका अध्यक्षांनी मी महिला आहे म्हणून मला घरी जायला सांगितलं होते." असा नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला सुद्धा लगावला आहे.