"अर्थ मंत्रालय कसं चालवायचं, याचं मार्गदर्शन, तुम्ही अजित पवारांकडून घेतलं पाहिजे"
लोकसभेत सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारला चिमटे
X
राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कृषी कायद्यांवरुन सरकारवर ताशेरे ओढले तर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी "तुमच्यापेक्षा आमचे अर्थमंत्री अजित पवार बरे" असं म्हणत चिमटे काढले आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाले की, "अर्थ मंत्रालय कसं चालवायचं, याचं मार्गदर्शन, तुम्ही अजित पवारांकडून घेतलं पाहिजे. लोकांकडून चांगल्या कल्पना नेहमीच घेतल्या पाहिजेत. जीएसटी येत नसतानाही, राज्य सरकारकडून योग्य व्यवस्था केली जात आहे. तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी नक्की घेऊ शकता."
"मोदी सरकारच्या अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक खासदाराचे 12 कोटी रूपये न विचारता परस्पर घेऊन टाकले. लोक विचारतात, एमपीलॅड फंड द्या. पण, तो तर मोदी जी घेऊन गेले. आता अडीच वर्षांसाठी काहीच मिळणार नाही. याउलट, "राज्याच्या अर्थमंत्र्यांनी हे सुनिश्चित केलं की, प्रत्येक आमदाराला, मग तो विरोधी पक्षातील असू दे. त्यांना 5 कोटी रूपयांचा निधी प्रत्येक वर्षाला मिळेल. यात कपात करण्यात आलेली नाही."
पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे...