Home > Political > सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले

सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन..

सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले
X

उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाची मनोभावे आरती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्नी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अजित पवारांनी दगडूशेठ मंदिरात आरतीदेखील केली. दोघंही दगडूशेठ चरणी नतमस्तक झाले. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावं यासाठी आपले उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे, त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले. मी नक्की निवडून येणार, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे. मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार या आपला नामांकन अर्ज पुणे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जमा करणार आहेत. तत्पूर्वी आज उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतलेत .

Updated : 18 April 2024 9:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top