Home > Political > मतदानाचा हक्क बजावला आणि प्रतिभा धानोरकर भावूक झाल्या; म्हणाल्या…

मतदानाचा हक्क बजावला आणि प्रतिभा धानोरकर भावूक झाल्या; म्हणाल्या…

मतदानाचा हक्क बजावला आणि प्रतिभा धानोरकर भावूक झाल्या; म्हणाल्या…
X

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सकाळी 7 वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे. नुकताच प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रतिभा धानोरकर भावुक का झाल्या ?

“आज 19 एप्रिल महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान आहे. माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून दुख:चा सुद्धा आहे. कारण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील लोकमान्य शाळेच्या बूतवर मी आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर जोडीने मतदान करण्यासाठी येत होते. पण आज त्यांची कमी क्षणोक्षणी जाणवत आहे. पण नशिबात असतं ते होतंच आणि आलेल्या सगळ्या अडचणींना सामोरं जात मी ही निवडणूक लढवत आहे. आज खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव असून, या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांना सामील होण्याचे आव्हान मी करत आहे”, असे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.




“आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं असून त्या संविधानामुळे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला असून हा अधिकार आपण बजावला पाहिजे. तसेच, संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मतदान करून लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम आपण केलं पाहिजे. आज विदर्भात कडक आहे, तरीही मी मतदारांना आव्हान करते की आपण घराबाहेर पडून मतदान करा आपले मतदान वाया जावू देऊ नका. जेवढ्या जास्तीत जास्त पद्धतीने मतदान करता येईल. तेवढं मतदान करा”, असेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

दरम्यान, देशातील 102 जागांवर मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. तसेच, 18 लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळणार आहेत. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होणार आहे.

Updated : 19 April 2024 10:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top