दिशा सालियान प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री, राणे अडचणीत?
X
सुशांत सिंह राजपूत आणि त्याची सेक्रेटरी दिशा सालियान यांच्या आत्महत्या नव्हत्या तर हत्या झाल्या असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. नारायण राणे यांनी दिशा सालियानची बदनामी केल्याची तक्रार किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. याप्रकरणाची तातडीने दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिशा सालीयन प्रकरणाचा सविस्तर अहवाल मालवणी पोलिसांना सादर करण्याचे निर्देश दिल्याची मागिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्या सोलापुरात पत्रकारांशी बोलत होत्या. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत चाकणकर यांनी सविस्तर अहवाल 48 तासात सादर करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहे. तसेच राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना प्रत्येकाने भान राखलं पाहिजे तसेच कुणाचा अपमान होणार नागी याची देखील काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.(1/4) pic.twitter.com/60qtTG4Ij6
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 21, 2022
दरम्यान महिला आयोगाच्या या निर्णयावर आमदार नितेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "मालवणी पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली नाही म्हणूनच हे प्रकरण सीबीआयकडे दिले गेले. आता त्याच पोलीस ठाण्याला महिला आयोगाने अहवाल देण्यास सांगितले आहे. हे किती योग्य आहे, ते कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?" असा सवाल नितेश राणे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
N because the Malvani police station didn't do a free n fair investigation the case was given to the CBI..
— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022
right?
N now the same police station is been asked to submit a report by the state women commission?
How fair is that?
Who r they trying to save?