Home > Political > मनसेत आता महिला"राज"..

मनसेत आता महिला"राज"..

मनसेत आता महिलाराज..
X

येत्या आगामी काळात होणाऱ्या विविध जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आता चांगलीच कामाला लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या बांधणीसाठी सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकतीच मनसेने कामगार सेना, नाविक सेना आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या होत्या. अश्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सुद्धा आता रिंगणात उतरली असून आज महिला सेनेची राज्यस्तरीय कार्यकारणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मनसे सरचिटणीस म्हणून शालिनी ठाकरे व रिटा गुप्ता यांना जाहीर केली आहे.

या कार्यकारणीत महिला सेना सरचिटणीस व उपाध्यक्षा जाहीर केल्या असून यात सुप्रिया दळवी, स्नेहल जाधव, सुचीता माने व दीपिका पवार यांची महिला सेना महिला सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर मुंबई क्षेत्रातील विविध लोकसभा क्षेत्रात महिला सेना महिला उपाध्यक्षा म्हणून ग्रेसी सिंग - दक्षिण मुंबई, ऋजुता परब – दक्षिण मध्य मुंबई, सुप्रिया पवार – उत्तर मुंबई, सौ. मीनल तुरडे – उत्तर मध्य मुंबई, श्रीम. सुनीता चुरी – उत्तर पश्चिम, अनिषा माजगावकर - ईशान्य मुंबई, सुजाता शेट्टी – महिला योजना व धोरण यांची वर्णी लागली आहे.

महिला सेना मुंबई पुरता मर्यादित न राहता इतर जिल्ह्यातही फोफावली असून याच पाश्वभूमीवर इतर जिल्ह्यातही नेमणुका करण्यात आल्या असून यामध्ये अलका टेकम - यवतमाळ , रेखा नगराळे – लातूर, सोनाली शिंदे- सातारा, वर्षा जगदाळे – बीड, सुजाता ढेरे – नाशिक, दीपिका पेडणेकर – डोंबिवली, चेतना रामचंद्रन - कल्याण पूर्व व उर्मिला तांबे – कल्याण पश्चिम यांना महिला सेना महिला "उपाध्यक्षा" म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही पहिली यादी आज जाहीर करण्यात आली असून लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा मध्यवर्ती कार्यकरणी जाहीर करण्यात येणार आहे.

आगामी पालिका निवडणुक तोंडावर आली असताना महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चांगलीच तयारीला लागली असून महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असलेल्या पालिका निवडणुकीत मनसेच्या विजयात महिला सेना सिंहाचा वाटा उचलेल अशी आशा मनसे सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे आणि सौ. रिटा गुप्ता यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

Updated : 9 July 2022 7:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top