Home > Political > चहा विकणारे आज रेल्वे, विमान कंपन्या विकतायत ; मेधा पाटकरांचा घणाघात

चहा विकणारे आज रेल्वे, विमान कंपन्या विकतायत ; मेधा पाटकरांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आता त्यांची खुर्ची विकायची शिल्लक ठेवली आहे. चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहेत. ही सर्व 2024 च्या निवडणुकीची तयारी चालू असल्याचे म्हणत मेधा पाटकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात..

चहा विकणारे आज  रेल्वे, विमान कंपन्या विकतायत ; मेधा पाटकरांचा घणाघात
X

शेतकरी सध्या देशभर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांचा लढा हा सुरूच राहील. समाजवाद ही काळाची गरज आहे असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले आहे.

सध्या शेतकरी विरोधी कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा रद्द व्हावा यासाठी संघर्ष सुरू आहे. आपल्याला शेतकरी, कामगार विरोधी धोरणाविरोधात मोठी लढाई करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आता त्यांची खुर्ची विकायची शिल्लक ठेवली आहे. चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहेत. ही सर्व 2024 च्या निवडणुकीची तयारी चालू असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या. त्या आज नाशिक या ठिकाणी विज कामगार मेळावा आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान बोलत होत्या.

Updated : 12 Oct 2021 6:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top