मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारी माणसे तुम्ही ...संगीता तिवारींचा स्मृती इराणींवर हल्लाबोल
सर्व महिला प्रदेश पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी मिळून बुधवारी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मृती इराणी यांच्या फसवेगिरी आणि भ्रष्टाचार विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे.
X
स्मृती इराणी यांच्या गोव्यातील 'सिली सोल' या रेस्टॉरंट आणि बार बाबतीत भ्रष्टाचार आणि फसवेगिरी विरोधात पुण्यात बुधवारी आंदोलन घेणार असल्याचे , महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी म्हंटले आहे.सर्व महिला प्रदेश पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी मिळून बुधवारी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मृती इराणी यांच्या फसवेगिरी आणि भ्रष्टाचार विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे.
'तू परेशान हैं अखबार से ,गोवा परेशान तेरे दारू के बार से' अशापद्धतीने स्मृती इराणींविरोधात आरोप केले जात आहेत. यासंदर्भातच पुण्यात बालगंधर्व चौकात बुधवारी आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर 'काय तो तुमचा गोवा,काय ते तुमचं सिली सोल बार,काय ती पत्रकार परिषद'असा टोला संगीता तिवारी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना लगावला आहे.'मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी माणसे आहात तुम्ही,केंद्रीय मंत्री आहात ,लाज वाटली पाहिजे तुम्हाला...पत्रकार परिषदेत 18 वर्षाच्या मुलीवर आरोप केले गेले असे म्हणता पण तिच्या मालकीचे रेस्टॉरंट आणि बार असल्याचं ती एका फूड व्लॉगरला स्वतः सांगते,तर तुम्ही कोणत्या संस्काराच्या गोष्टी करता ',अशी खोचक टिप्पणी सुद्धा संगीता तिवारींनी केली आहे.