Home > Political > ग्रामीण महिलांनी वारली चित्रांनी रंगविले सिद्धगड शासकीय निवासस्थान

ग्रामीण महिलांनी वारली चित्रांनी रंगविले सिद्धगड शासकीय निवासस्थान

ग्रामीण महिलांनी वारली चित्रांनी  रंगविले सिद्धगड शासकीय निवासस्थान
X

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी वारली चित्रे भिंतींवर रंगविण्यात येत आहेत. ही चित्रे कोणत्याही व्यवसायिक कलाकारांकडून नाही तर आदिवासी पट्ट्यातून येणाऱ्या ग्रामीण महिलांकडून रंगवण्यात येत आहेत. माविमच्या माध्यमातून महिलांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या या कौशल्या बाबत तसेच त्यांनी काढलेल्या वारली चित्रांबद्दल महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट ठाकूर यांनी गौरवोद्गार काढले आहेत. महिलांच्या या कलेला शासनाच्या माध्यमातून शक्य तिथे संधी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यांना विविध क्षेत्रांमध्ये काम करता यावे. यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रयत्न केले जातात. महिला आर्थिक विकास महामंडळाने भिवंडी तालुक्यातील अनगव, अंबाडी. वज्रेश्वरी येथील महिलांना चित्र काढण्याची संधी दिली. या महिलांच्या संस्थेमार्फत ग्रामीण भारताच्या बिजनेस सखी प्रपल प्रकल्पांतर्गत काम करतात. या आदिवासी महिला आपल्या पारंपरिक वारली कलेचा प्रचार आणि प्रसार आपल्या कलेच्या माध्यमातून करीत आहेत तसेच या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून आदिवासी महिलांना उदरनिर्वाहाचे साधन यानिमित्ताने उपलब्ध करून दिले जात आहे.

या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षित महिला आणि अशिक्षित आदिवासी महिलांची सांगड घालून असे उपक्रम राबविण्यात येतात अशी माहिती खिडके येथील कशिश जाधव यांनी दिली. वारली चित्रकलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असल्याने महिला सशक्तीकरणासाठी जागृती करता येते, तसेच महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचेही, जाधव यांनी सांगितले.

Updated : 15 Feb 2022 11:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top