Home > Political > आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; श्वेता महाले आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर संतापल्या

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; श्वेता महाले आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर संतापल्या

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द; श्वेता महाले आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर संतापल्या
X

आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट 'क' व आणि 'ड' पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. तर यावरून भाजपच्या आमदार श्वेता महाले ( shweta mahale )यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे ( rajesh tope ) यांच्यावर टीका करत, 'पुन्ह कोणी स्वप्नील सारखं टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महाले यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "आघाडीच्या महागोंधळाचा उच्चांक. आरोग्य विभागाची उद्या होऊ घातलेली परिक्षा रात्री १० वा. मेसेज पाठवून रद्द केली. बरेच जण परीक्षेच्या ठिकाणी पोहचले सुद्धा आहेत. या मनस्तापाची आणि देव न करो पण कोणी स्वप्नील सारखं टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार की आरोग्यमंत्री', असा प्रश्न महाले यांनी उपस्थित केला आहे.

दुसऱ्या दिवशी पेपर असल्याने अनेक विध्यार्थी रात्रीचं सेंटरकडे निघाले होते. तर काही जण प्रवासात होते. मात्र अचानक रात्री १० च्या सुमारास परीक्षा रद्द झाली असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. तर सरकार विरोधात संताप सुद्धा पाहायला मिळत आहे.

Updated : 25 Sept 2021 8:42 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top