"सत्ता चालवण्यासाठी जातीचे लोक लागतात" श्वेता महालेंचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
X
काल सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश राज्यसरकारला ओबीसी अरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. यावर भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी महाराष्ट्रातील OBC आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. "मध्य प्रदेशमधील OBC आरक्षण मुख्यमंत्री शिवराजसिंह चोहान यांनी केंद्र सरकारच्या नावाने बोटे न मोडता, त्रिसूत्रीचे पालन करून ओबीसींना न्याय दिला. पण महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा घात केला आहे." असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.
काय म्हणाल्या आमदार श्वेता महाले..
"मराठा समाजाबरोबर ओबीसी समाजाचे आरक्षण घालवण्याचे पाप हे महाविकास आघाडी सरकारने केला आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून आज महाविकास आघाडी सत्तेत आहे. सत्ता अपघाताने, दगाबाजी करून मिळवू शकता. परंतु सत्ता चालवण्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. सत्ता चालवण्यासाठी जातीचे लोक लागतात." असं म्हणत श्वेता महाले यांनी महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली आहे.